*नालासोपारा येथे सौंदळकर वाडी चॅम्पियन ट्रॉफी 2026 उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नालासोपारा येथे सौंदळकर वाडी चॅम्पियन ट्रॉफी 2026 उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
*नालासोपारा येथे सौंदळकर वाडी चॅम्पियन ट्रॉफी 2026 उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील ताम्हाणे गावातील सर्व क्रिकेट प्रेमींना एकत्रित आणण्याच्या हेतूने 22 मार्च 2026 रोजी नालासोपारा डम्पिंग ग्राउंड येथे तरुण उत्कर्ष मंडळ पुरस्कृत आणि अविनाश क्रिकेट संघ सौंदळकर वाडी आयोजित सौंदळकर वाडी चॅम्पियन ट्रॉफी
2026 चे भव्य आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत गावातील 14 संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक माऊली चव्हाणवाडी, द्वितीय क्रमांक यंगस्टार नवलुवाडी, तृतीय क्रमांक ब्राम्हण देव पाहिलेवाडी चतुर्थ क्रमांक गुप्तादेवी (ब) कडूवाडी आदी संघ मानकरी ठरले.
उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुशांत राऊत, उत्कृष्ट गोलंदाज निशांत चव्हाण आणि मालिकावीर अनिकेश वाफेलकर यांना वैयक्तिक परितोषिकाचा मान पटकावला. पराजित संघाना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर टी-शर्ट देण्यात आले आणि प्रत्येक संघाच्या कर्णधारला टी शर्ट देण्यात आले कार्यक्रमाला वाडकरी बंधू आवर्जून उपस्थित राहिले होते. सकाळी 9 वाजता सखाराम चव्हाण, सखाराम सौंदळकर, राजाराम जाधव, राजा चव्हाण, जयराम जाधव हरिश्चंद्र वाफेलकर आणि अविनाश क्रीडा मंडळलाचे सदस्य यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेला सहकार्य लाभलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले. राजा चव्हाण, कृष्णा वापीलकर कमलाकर चव्हाण, नाना इस्कर, दत्तप्रसाद हरियाण, तुषार कालप, संजय सौंदळकर, संदीप पवार, नंदिनी गुरव, सौ.वंदना सौंदळकर, विकास अडसूळ, शिवाजी जाधव, प्रभाकर वाफेलकर, एकनाथ सौंदळकर यांच्या सहकार्याने स्पर्धा चांगल्या रित्या पार पडल्या. यावेळी ताम्हाणे क्रिकेट समितीचे मनःपूर्व आभार मानण्यात आले.



