*वाराणसीतील आंतरराष्ट्रीय परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा लक्षवेधी शोधनिबंध, जागतिक समस्यांवर ‘अध्यात्म आणि सजगता’ हाच प्रभावी उपाय!- शॉन क्लार्क*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वाराणसीतील आंतरराष्ट्रीय परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा लक्षवेधी शोधनिबंध, जागतिक समस्यांवर ‘अध्यात्म आणि सजगता’ हाच प्रभावी उपाय!- शॉन क्लार्क*
*वाराणसीतील आंतरराष्ट्रीय परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा लक्षवेधी शोधनिबंध, जागतिक समस्यांवर ‘अध्यात्म आणि सजगता’ हाच प्रभावी उपाय!- शॉन क्लार्क*
वाराणसी(प्रतिनिधी):-जगाला भेडसावणारी अनेक आव्हाने आणि समस्या अध्यात्म अन् सजगतेच्या साहाय्याने सोडवता येणे शक्य आहे. शाश्वत जीवनशैली आणि विश्वकल्याणासाठी आध्यात्मिक सकारात्मकता अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी शॉन क्लार्क यांनी येथे केले. वाराणसी येथील ‘स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’मध्ये आयोजित 13 व्या जागतिक परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत त्यांनी ‘विश्वकल्याण, शाश्वतता आणि डिजिटल सजगता’ या विषयावरील शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचे प्रमुख लेखक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले असून शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. शिक्षणक्षेत्र, उद्योगजगत् व सार्वजनिक संस्थांमधील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीत हा शोधनिबंध मांडण्यात आला.
धार्मिक पर्यटनातील वाढ बदलत्या मानसिकतेचे प्रतीक क्लार्क यांनी भारतातील वाढत्या धार्मिक पर्यटनाकडे लक्ष वेधले. केवळ लोकप्रिय पर्यटनस्थळांना भेट देण्याऐवजी आता नागरिक वाराणासी आणि अयोध्या यांसारख्या तीर्थक्षेत्रांना प्राधान्य देत आहेत. वर्ष 2025 मध्ये अयोध्येला 23.80 कोटी, तर वाराणसीला 14.6 कोटी पर्यटकांनी भेट दिली. तसेच, 2025 च्या महाकुंभमेळ्यात कोट्यवधींची गर्दी असूनही उच्च आणि व्यापक चेतनेमुळे व्यवस्थापनाच्या समस्या निर्माण झाल्या नाहीत, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
संशोधनातून समोर आलेले महत्त्वपूर्ण निष्कर्ष:, महाकुंभ स्नानाचे लाभ: विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनानुसार, महाकुंभाच्या काळात त्रिवेणी संगमात केलेल्या 5 मिनिटांच्या स्नानामुळे भाविकांच्या प्रभावळीत ('ऑरा'मध्ये) 60% सकारात्मक वाढ झाली. एका विदेशी नागरिकामध्ये ही वाढ तब्बल 133% इतकी दिसून आली. अयोध्येतील चैतन्यात वाढ अयोध्येतील श्री रामलल्ला मंदिर परिसरात वर्ष 2011 ते 2024 या काळात चैतन्यात 1400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या दर्शकांच्या सकारात्मकतेत 145% वाढ, तर नकारात्मकतेत 60% घट नोंदवली गेली. भारतीय गायींचे महत्त्व: ‘पी.आय.पी. (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाद्वारे सिद्ध झाले आहे की, भारतीय गायीचे तूप आणि गोमूत्र आरोग्यदायी व आध्यात्मिक लाभ देणारे आहेत.
उपचारांसोबत नामजपाचा प्रभाव: वैद्यकीय उपचारांसोबत आध्यात्मिक उपाय म्हणून 'नामजप' केल्यास एक्झिमासारखे जुनाट त्वचारोग आणि व्यसनाधीनता अल्पावधीत बरी होऊ शकते, हे विविध 'केस स्टडीज'द्वारे स्पष्ट करण्यात आले.
पंचमहाभूते आणि पर्यावरण संतुलन, कोणतेही क्षेत्र अध्यात्मावर आधारित असल्यास, वातावरणातील सात्त्विकता वाढते. प्राचीन भारतीय कला सात्त्विक ठिकाणी सादर केल्यास आध्यात्मिक प्रगतीला चालना मिळते. क्लार्क यांनी पंचमहाभूते, जागतिक हवामान, ऊर्जा आणि चैतन्य यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. गोव्यातील फोंडा येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात प्रगट झालेल्या ‘दैवी कणां’चे उदाहरण त्यांनी यावेळी दिले.
‘भारतीय ज्ञान परंपरा’ आणि 'सनातन धर्म' यांच्या आधारे प्रत्येक क्षेत्रात सात्त्विकता वाढवून मानवी कल्याण आणि पर्यावरण संतुलन साधण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरत आहेत, असा निष्कर्ष या परिषदेतून समोर आला.



