*ईस्माईल दगू फाऊंडेशनतर्फे हज यात्रेकरुंचा सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ईस्माईल दगू फाऊंडेशनतर्फे हज यात्रेकरुंचा सत्कार*
*ईस्माईल दगू फाऊंडेशनतर्फे हज यात्रेकरुंचा सत्कार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे पवित्र हज उमरा मक्का मदिना यात्रेस जाणार्या हज यात्रेकरुंचा सत्कार करण्यात आला. यावेळी नंदुरबार येथून दहा हज यात्रेकरु मक्का मदिनासाठी रवाना झाले. यावेळी सर्व यात्रेकरुंचा शाल, पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सुखरुप यात्रेसाठी त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या. यात्रेकरुंमध्ये सैय्यद मकसुद, रऊफ शाह, गुलाम दस्तगीर, सैय्यद साहील, सलीम शेख, सैय्यद शकीला, फरजाना शाह, मुमताज बानो, नसीम शेख, परवीन बानो यांचा समावेश आहे.
यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान म्हणाले की, इस्माल धर्माचे धर्मगुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांनी मानवता, दया, प्रेम शांतीचा संदेश दिलेला आहे, असे पवित्र ठिकाणी व मक्का मदिना असे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी यावेळी दर्शन होते. व आपली धार्मिक विधी, भक्ती, उपासना, आराधना करुन या पवित्र ठिकाणी भाविक प्रार्थना करतात. यावेळी पवित्र हज उमराचा प्रवास सुखरुप व्हावा व नंदुरबार जिल्ह्यात शांती व बंधुत्व भाव कायम रहावा, यासाठी प्रार्थना करण्यात यावी, असे सांगितले. यावेळी निशाद पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप सोनवणे, सामाजिक न्याय व हक्क परिषदेचे अध्यक्ष अरुण रामराजे, राजेंद्रकुमार बुवा, शकील खतिब, ओबीसी ऑर्गनायझेशनचे शहर उपाध्यक्ष अजिम बागवान, तैय्यबा शेख, आप्पा वाघ, युसुफ शेख, कामिल शेख, सादीक शेख आदी उपस्थित होते.



