*ओझर तांबळवाडी येथे आजपासून श्री.हनुमान जयंती उत्सवाला सुरुवात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओझर तांबळवाडी येथे आजपासून श्री.हनुमान जयंती उत्सवाला सुरुवात*
*ओझर तांबळवाडी येथे आजपासून श्री.हनुमान जयंती उत्सवाला सुरुवात*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील पूर्व भागात वसलेल्या मौजे ओझर गावातील तांबळवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सव मंडळ तांबळवाडी यांच्या वतीने 28 मार्च ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत भव्य श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे
28, 29 मार्च 2026 रोजी पंचक्रोशी वाडी मर्यादित ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा, 1 एप्रिल रोजी 8 वा. दिपोत्सव, रात्री 9.30 वा. विघ्नेश्वर महिला भजन मंडळ आणि रा.10.30 वा विघ्नेश्वर भजन मंडळ गोसावीवाडी यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. 2 एप्रिल 2026 रोजी पहाटे 5.30 वा.जय हनुमान भजन मंडळ तांबळवाडी यांच्या भजनाचा कार्यक्रम, स. 6.33 वा मारुती रायांचा जन्मोत्सव आणि अभिषेक सोहळा, स.7 वा काकड आरती,स. 7.30 वा.पालखी मिरवणूक सोहळा, स. 11 वा. श्री सत्यनारायण महापूजा आणि आरती, दु.12.30 ते 2.30 महाप्रसाद, दु.4 वा. महिला मंडळ तांबळवाडी आयोजित हळदीकुंकू आणि गरबा नृत्य कार्यक्रम, सायं 7.45 ते 9 पालखी प्रदक्षिणा तसेच नवसाचा कार्यक्रम, रात्री 9 वा. मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ आणि रात्री 10 वा. सह्याद्री मार्लेश्वर नमन कलामंच पाटगाव यांचे स्त्री पुरुष पात्रांनी नटलेले बहुरंगी नमन सादर होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही होणाऱ्या या हनुमान जन्मोत्सव सोहळ्याला भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री हनुमान जन्मोत्सव मंडळ (पूर्व तांबळवाडी) ओझर यांच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष नामदेव सकपाळ, गणपत ताम्हणकर, अध्यक्ष चंद्रकांत ताम्हणकर, प्रकाश सकपाळ, सचिव चंद्रकांत म्हादये, नरेश हातणकर, खजिनदार ओमकार बाईत, संजय ताम्हणकर, अंतर्गत हि. तपासनीस अमोल ताम्हणकर, वाडीप्रमुख रामचंद्र उंबरकर, रमेश ताम्हणकर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मंडळ यांनी केले आहे.



