*कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 35 व्या वर्धापन दिन सोहळ्यात श्री वासुदेव तुळसणकर यांचा गौरव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 35 व्या वर्धापन दिन सोहळ्यात श्री वासुदेव तुळसणकर यांचा गौरव*
*कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 35 व्या वर्धापन दिन सोहळ्यात श्री वासुदेव तुळसणकर यांचा गौरव*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-कोकण मराठी साहित्य परिषदेचा 35 वा वर्धापन दिन सोहळा 24 मार्च 2026 रोजी कवी केशवसुत स्मारक, मालगुंड, रत्नागिरी येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गेली अनेक वर्षे मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आणि मराठी साहित्य चळवळ प्रभावी ठेवण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून करत असलेल्या सेवेबद्दल ओणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते वासुदेव तुळसणकर यांचा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा सौ. नमिता कीर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा डॉ प्रदीप ढवळ तसेच अनेक कवी साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.