*इस्कॉन परिवाराच्या सत्संग भवनाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*इस्कॉन परिवाराच्या सत्संग भवनाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन*
*इस्कॉन परिवाराच्या सत्संग भवनाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉन परिवाराच्या करजकुपे शिवारातील नवीन सत्संग भवनाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते रामनवमीच्या मुहूर्तावर झाले.याप्रसंगी बोलताना आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, हिंदू संस्कृतीला साता समुद्रा पार पोहोचविण्याचे महान कार्य इस्कॉन परिवार करीत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने संघटितपणे काम करून इस्कॉन प्रमाणे धर्मकार्याच्या प्रचार प्रसार करावा. इस्कॉनच्या प्रचार प्रसार कार्यासाठी भविष्यात शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले. सत्संग भवन उद्घाटन प्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सोबत उद्योजक मोतीलाल ओस्तवाल, अनिल पाटील, गजेंद्र शिंपी, तसेच डॉ. राहुल पाटील शहादा, अड. जतीन वाघेला दोंडाईचा, आर्किटेक सचिन साळी, मुकेश बॅटरीवाला, करण बालानी, निखिल देसाई, भालचंद्र पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन इस्कॉन परिवाराचे प्रमुख माधव शामसुंदर दास, मोतीलाल घमंडे,आणि साधकांनी केले.



