*रत्नागिरी येथे गझल संमेलन संपन्न, गझलयात्री भाग 8 गझल संग्रहाचे प्रकाशन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रत्नागिरी येथे गझल संमेलन संपन्न, गझलयात्री भाग 8 गझल संग्रहाचे प्रकाशन*
*रत्नागिरी येथे गझल संमेलन संपन्न, गझलयात्री भाग 8 गझल संग्रहाचे प्रकाशन*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-गझल मंथन संस्था कोरपना जि. चंद्रपूर आयोजित एक दिवसीय कोकण मराठी गझल संमेलन मान्यवर गझलकारांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे नुकतेच संपन्न झाले. आजच्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कैलास गायकवाड, उदघाटक राधा भावे, प्रमुख अतिथी केदार पाटणकर, प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. मनोज वराडे या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले व ज्येष्ठ गझलकार स्व. सुरेश भट यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कैलास गायकवाड यांचा सन्मान गझल मंथनचे कोकण विभागाचे डॉ. मनोज वराडे यांनी केलं. उदघाटक राधाताई भावे यांचा सन्मान कोकण विभागाच्या सहसचिव सुनेत्रा जोशी यांनी सन्मान केला. तर प्रमुख अतिथी केदार पाटणकर यांचा सन्मान कोकण उप विभाग प्रमुख संजय कुळये यांनी केला. स्वागताध्यक्ष पूर्णिमा पवार यांचा सन्मान अर्चना देवधर यांनी केला.
यानंतर संजय कुळये यांनी प्रास्ताविक केले आणि गझल मंथन साहित्य संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. राधा आपल्या मनोगतातून गझलेबाबत छान मार्गदर्शन केले.डॉ. मनोज वराडे, केदार पाटणकर, पूर्णिमा पवार, सुनेत्रा जोशी यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष पदावरून डॉ. कैलास गायकवाड यांनी नवोदित गझलकारांनी गझल कशी लिहावी. शेरातील गझलियत म्हणजे काय? ताकदीचा शेर कसा लिहावा याबाबत आपल्या मनोगतातून छान मार्गदर्शन केले. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण गझलयात्री 8 या कोकण विभागातील गझलकारांच्या गझला अंतर्भूत असणारा गझल संग्रहाचे प्रकाशन. तत्पूर्वी डॉ. मनोज वराडे यांनी या पुस्तकाची पार्श्वभूमी, प्रकाशनपूर्व तयारी त्यामागील मेहनत ते पुस्तकाची बांधणी याबाबत भाष्य केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते गझलकारांच्या उपस्थितीत गझलयात्री 8 चे दिमाखात प्रकाशन झाले. सर्व सहभागी गझलकारांचे अभिनंदन करण्यात आले. उदघाटन सत्र इथे संपले. या सत्राचे सूत्रसंचालन सौ. मुग्धा कुळये यांनी केले. यानंतर निमंत्रितांचा मुशायरा संपन्न झाला. या सत्राचे अध्यक्ष होते डॉ. कैलास गायकवाड व सूत्रसंचालन केले सौ. माधुरी खांडेकर यांनी. यामध्ये राधा भावे, केदार पाटणकर, पूर्णिमा पवार, मनोज वराडे सहभागी झाले होते.
गझल मुशायऱ्यांचे पुढे तीन सत्र संपन्न झाले. यांचे अध्यक्ष स्थान रवींद्र यशवंतराव, मानसी जोशी, सुनेत्रा जोशी यांनी भूषविले. तर या सत्रांचे सूत्रसंचालन सचिन इनामदार, अर्चना देवधर, विशाखा पाटोळे यांनी केले तर संजय कुळये यांनी आभार व्यक्त केले. आजच्या गझल संमेलनातील चारही मुशायरे एकाहून एक सरस गझलांनी बहारदार झाले. सर्व गझल रसिकांनी गझल प्रेमीनी या कार्यक्रमाचा छान आस्वाद घेतला.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर येथील गझलकारांनी या संमेलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आजचे हे गझल संमेलन यशस्वी करून दाखविले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रत्नागिरी येथील गझल मंथनचे कोकण उप विभाग प्रमुख संजय कुळये, सुनेत्रा जोशी, जिल्हा कार्यकारिणीतील मुग्धा कुळये, आशिष सावंत, संजय तांबे, अर्चना देवधर, विशाखा पाटोळे, कश्मिरा पालेकर यांनी विशेष मेहनत घेतली. यासाठी गझल मंथन संस्थेचे आयोजक डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, अनिल कांबळे यांनी येथील कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.



