*28 व 29 मार्च रोजी मतदार यादी मॅपिंगसाठी विशेष शिबिरे-शिवांश सिंह*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*28 व 29 मार्च रोजी मतदार यादी मॅपिंगसाठी विशेष शिबिरे-शिवांश सिंह*
*28 व 29 मार्च रोजी मतदार यादी मॅपिंगसाठी विशेष शिबिरे-शिवांश सिंह*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आगामी काळात महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमा’च्या (SIR) पूर्वतयारीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महत्त्वपूर्ण कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सन 2024 च्या मतदार यादीतील मतदारांचे सन 2002 च्या मतदार यादीशी 'मॅपिंग' करण्याचे काम सध्या प्रशासनातर्फे हाती घेण्यात आले असून, नागरिकांच्या सुविधेसाठी येत्या शनिवारी आणि रविवारी नंदुरबार शहरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार शिवांश सिंह यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
शिबिराची वेळ व ठिकाण, शनिवार दिनांक 28 आणि रविवार 29 मार्च, 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये ही शिबिरे पार पडतील. येथे होतील शिबिरे (कंसात मतदान केंद्र क्रमांक), एस. ए. मिशन मराठी हायस्कूल (263 ते 276), महात्मा फुले हायस्कूल (277 ते 280), अभिनव विद्यालय (291, 292, 293, 294, 297, 298), डी. आर. हायस्कूल (299 ते 302,331), नगर परिषद शाळा क्र. 1 (303, 304, 305), स्वामी विवेकानंद हायस्कूल (306 ते 311), नॅशनल गर्ल्स उर्दू हायस्कूल (312 ते 317, 336, 342, 343), डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल (321 ते 326), जी. टी. पाटील कॉलेज (327 ते 330), लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय (332 ते 335, 344 ते 347, 363), अँग्लो उर्दू हायस्कूल (337 ते 341), श्रॉफ हायस्कूल (348 ते 360), नगर परिषद हॉल (318 ते 320, 361, 362, 364 ते 367), गटसाधन केंद्र (गुरांचा दवाखाना) हाट दरवाजा (281 ते 290, 294 ते 296). मतदारांना आवाहन,
नागरिकांनी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन तेथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधावा. आवश्यक ती माहिती देऊन आपले मॅपिंग करून घ्यावे, असेही आवाहन तहसीलदार शिवांश सिंह यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



