*वेटलीबारपाडा येथे तीन ते चार वर्ष उलटून देखील प्रशासनाच्या उदासीनतेमूळे घरकूलचे काम अपूर्ण असल्याने संबंधित घरकुल धारकांवर उघड्यावर राहण्याची वेळ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वेटलीबारपाडा येथे तीन ते चार वर्ष उलटून देखील प्रशासनाच्या उदासीनतेमूळे घरकूलचे काम अपूर्ण असल्याने संबंधित घरकुल धारकांवर उघड्यावर राहण्याची वेळ*
*वेटलीबारपाडा येथे तीन ते चार वर्ष उलटून देखील प्रशासनाच्या उदासीनतेमूळे घरकूलचे काम अपूर्ण असल्याने संबंधित घरकुल धारकांवर उघड्यावर राहण्याची वेळ*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वेटलीबारपाडा येथे तीन ते चार वर्ष उलटून देखील प्रशासनाच्या उदासीनतेमूळे घरकूलचे काम अपूर्ण असल्याने संबंधित घरकुल धारकांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील रहिवाशांना हक्काचे पक्के घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली. यातील दुस-या टप्प्यातील सन 2021-22 या वर्षातील ड यादीतील लाभार्थी यांचे घरकुल मंजूरी चे आदेश अक्कलकुवा येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांचे मिळून देखील अद्यापपर्यंत घरकुलचे पूर्ण हप्ते मिळाले नसल्याने सरीच्या वेटलीबारपाडा येथील लाभार्थी टेड्या गोविंदा वसावे हे प्रशासकीय यंत्रणेच्या लालफितीत अडकून चार ते पाच वर्ष उलटून देखील घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. सन 2024 मध्ये घरकुलचा 18 हजारचा पहिला हप्ता प्राप्त झाला तर सन 2025 मध्ये 70 हजार चा हप्ता खात्यावर जमा झाला. 2026 उजाडला असून उर्वरित 73 हजार इतकी रक्कम अद्याप खात्यावर जमा झाली नसल्याने चार पाच वर्षे उलटून देखील घरकूल पुर्ण झाले नाही. याबाबत संबंधित अभियंता व पंचायत समितीच्या अधिका-यांशी संपर्क साधून ही उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे टेड्या वसावे यांनी सांगितले. मागील गेल्या चार वर्षांपासून घरकुल मंजूर असून अद्यापही पूर्ण रक्कम मिळाली नसल्याने घरकूलचे काम अपूर्ण आहे. घरकूल मंजूरीच्या आदेशावर दिनांक देखील टाकण्यात आलेला नाही, यावरून लक्षात येते की पंचायत समितीचा किती भोंगळ कारभार सुरू आहे. याबाबत संबंधित अभियंता यांच्याशी संपर्क साधून ही काही उपयोग झाला नाही. व अद्याप पर्यंत 73 हजार रूपयांचे अनुदान बाकी असल्याने घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. तरी संबंधित अधिकारी व अभियंता यांच्यावर कारवाई व्हावी.



