*तृप्ती देसाई, बालाजी जाधव, प्रा रामेश्वर बद्दर व उमरी ते शिर्डी पदयात्रेला नानक साई अवॉर्ड प्रदान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तृप्ती देसाई, बालाजी जाधव, प्रा रामेश्वर बद्दर व उमरी ते शिर्डी पदयात्रेला नानक साई अवॉर्ड प्रदान*
*तृप्ती देसाई, बालाजी जाधव, प्रा रामेश्वर बद्दर व उमरी ते शिर्डी पदयात्रेला नानक साई अवॉर्ड प्रदान*
नांदेड(प्रतिनिधी):-रामनवमीच्या पावन पर्वावर नानक साई फाऊंडेशन या संस्थेतर्फे शिर्डी येथे विशाल साई भक्त संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन साईबाबा शिर्डी संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सह नांदेड येथील प्रसिद्ध उद्योजक बालाजीराव जाधव, प्रा रामेश्वर बद्दर, उमरी ते शिर्डी या पदयात्रेला शिर्डीत नानक साई अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. शिर्डीच्या नगरअध्यक्षा सौ जयश्री थोरात, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डीचे प्रथम नगरअध्यक्ष काकासाहेब कोते, माजी उपनगर अध्यक्ष विजय कोते, नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, सुरेश वाबळे, साईभक्त दिलीप कंदकुर्ते, राजकुमार चौगुले, नामदेव कुंभार, पंढरीनाथ पगार, सुनील निकम, सरदार प्रितम सिंघ भाटिया, साईप्रसाद खांडरे, सौ प्रफुल्ला बोकारे, पंकज लोढा, संजय कदम रुईकर, धनंजय उमरीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शिर्डीत आयोजित केलेल्या विशाल साई भक्त संमेलन मध्ये नानक साई अवॉर्ड प्रदान करण्यात आले. शिर्डीच्या नगर अध्यक्षा सौ जयश्री विष्णु पंत थोरात, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पुणे, प्रमोद आहेर, शिर्ड उद्योजक बालाजी जाधव नांदेड, सरदार अजितसिंघ नीर, ज्येष्ठ संपादक प्रा रामेश्वर बद्दर लातूर, सरदार हरबिर सिंघ हेयर कल्याण, सरदार जयदीप सिंघजी अरोरा दुबई, अतुल कोल्हे भद्रावती, ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाऊंडेशन, अशोक मामीडवार उमरी, विष्णु अट्टल उमरी, सुभाष गोरठेकर उमरी, गोपाल राठोड, संभाजी सावंत उमरी, दिलीप जाधव छत्रपती संभाजीनगर, किशोर बाबुलाल चित्ते, धम्मशील सावंत रायगड, मिलिंदकुमार लोहार सातारा, रघुनाथ बेलदार शहादा, सूनील कांबळे कोल्हापूर यांना नानक साई अवॉर्ड देण्यात आले. नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डीत हा कार्यक्रम संपन्न झाला. मोठ्या संख्येने साई भक्त उपस्थित होते.



