ताजा खबरे:
*अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य; युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट तीव्र निषेध नोंदविण्याचा इशारा*
*जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर-प्रमोद भामरे*
*क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवस मोहिम" 24 मार्च 2026 पासून राबविणे*
*रावल बी एड कॉलेजच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन*
*नंदुरबार तालुका विधायक समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध कला गुण दर्शन"कलाविष्कार "कार्यक्रम उत्सव संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य; युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट तीव्र निषेध नोंदविण्याचा इशारा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य; युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट तीव्र निषेध नोंदविण्याचा इशारा*

  • Share:

*अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य, युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट तीव्र निषेध नोंदविण्याचा इशारा*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-तालुक्यातील पंचायत समिती अक्कलकुवा कार्यालयाचा संपूर्ण परिसर तसेच कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या मागील भागात भीषण अस्वच्छता निर्माण झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासकीय कामकाजाचे केंद्र असलेल्या या ठिकाणीच सर्वत्र प्लास्टिक कचरा, सुकलेले गवत, वाढलेली झुडपे आणि कचऱ्याचे ढीग पसरलेले दिसून येत आहेत. काही ठिकाणी कचरा जाळल्याचेही स्पष्ट चिन्ह दिसून येत असून त्यामुळे पर्यावरणीय हानीसोबतच आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पंचायत समितीच्या मुख्य इमारतीच्या आजूबाजूला तसेच मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर घाण साचलेली आहे. विशेषतः कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या मागील भागातही अशीच परिस्थिती असून तेथील जागा जणू कचरा टाकण्याचे ठिकाण बनली आहे. यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी, डास व इतर घातक कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या स्वतःच्या कार्यालय परिसरातच अशी अस्वच्छता दिसून येणे ही अत्यंत लज्जास्पद बाब मानली जात आहे. प्रशासनाने स्वतःच्या आवारात स्वच्छता राखण्यात अपयश आले असल्याचे या परिस्थितीतून स्पष्ट दिसून येते. नियमित साफसफाईसाठी नियुक्त कर्मचारी असूनही अशी अवस्था का निर्माण झाली, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे या प्रकरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा उघडपणे समोर येत असल्याची टीका होत आहे. दरम्यान, या गंभीर बाबीची दखल घेत युवा क्रांती नंदुरबार या सामाजिक संघटनेच्या वतीने मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती अक्कलकुवा यांना तीव्र शब्दांत निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट बोट ठेवत तात्काळ संपूर्ण परिसराची साफसफाई करावी, साचलेला कचरा हटवून योग्य कचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी करावी, तसेच निष्काळजी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, येत्या तीन दिवसांच्या आत आवश्यक ती कारवाई न झाल्यास पंचायत समिती आवारातच आगळीवेगळी स्वच्छता मोहीम राबवून शासनाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात येईल, असा स्पष्ट इशारा युवा क्रांती नंदुरबारच्या वतीने देण्यात आला आहे. या इशाऱ्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून आता ते कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर निवेदन देताना युवा क्रांती नंदुरबारचे जिल्हा उपप्रमुख डॉ. पंकज तडवी, तालुकाध्यक्ष धिरसिंग वसावे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी परिसराची पाहणी करून प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
एकूणच, पंचायत समिती अक्कलकुवा परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न आता केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित राहिलेला नसून तो प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला आहे. स्वच्छतेचे धडे देणाऱ्या यंत्रणेनेच स्वतःच्या परिसरात स्वच्छता राखण्यात अपयश आले असल्याने या प्रकरणी तात्काळ व ठोस कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी सर्व स्तरांतून जोर धरत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य; युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट तीव्र निषेध नोंदविण्याचा इशारा*
March, 23 2026
*जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर-प्रमोद भामरे*
March, 23 2026
*क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवस मोहिम" 24 मार्च 2026 पासून राबविणे*
March, 23 2026
*रावल बी एड कॉलेजच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन*
March, 23 2026
*नंदुरबार तालुका विधायक समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध कला गुण दर्शन"कलाविष्कार "कार्यक्रम उत्सव संपन्न*
March, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज