*रावल बी एड कॉलेजच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रावल बी एड कॉलेजच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन*
*रावल बी एड कॉलेजच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन*
दोंडाईचा(प्रतिनिधी):-येथील श्रीमंत राजे दौलतसिंह रावल बी.एड. कॉलेजच्या एक दिवशीय शैक्षणिक सहल व क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आलेले होते. सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा समजून घेणे, सामाजिक कौशल्य वाढविणे, निसर्गाची आवड निर्माण करणे, प्रवासातून शारीरिक व मानसिक ताजेपणा अनुभवणे अशा विविध उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी महाविद्यालयात शैक्षणिक सहल व क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी बी.एड. अभ्यासक्रमांतर्गत पर्यावरण अभ्यास या विषयांतर्गत शैक्षणिक सहलीचे नियोजन केलेले होते. प्रथम वर्ष बी. एड.मधील सर्व विद्यार्थी या सहलीसाठी उपस्थित होते.
सर्वप्रथम चाळीसगाव जवळ असलेल्या पाटणा या गावा जवळ असलेल्या गौताळा अभयारण्यातील चंडिका देवी (पाटणादेवी) येथे भेट देण्यात आली. परिसरात अर्धगोलाकार डोंगररांगा आहे. सुंदर परिसर आहे. तेथील स्थानास विद्यार्थ्यांनी भेट दिली. तेथील सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा समजून घेतला. मंदिराची रचना हेमांडपंथी आहे. त्यानंतर वालझिरी येथे भेट दिली. पिंपरखेड गावाजवळ हे स्थान आहे. महर्षी वाल्मिकी मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, दत्त मंदिर व राम मंदिरास विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यानंतर चाळीसगावातील कलामहर्षी केकी मूस कलादालन व सांस्कृतिक केंद्रास विद्यार्थ्यांनी भेट दिली. केकी मूस यांच्या विषयी व त्यांनी केलेल्या विविध कलाकृतींचे विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले. तेथील विविध प्रकारचे लाकूड काम, पुतळे, दुर्मिळ जुनी भांडी, खेळणी, फर्निचर व नाणी यांच्या विषयी माहिती जाणून घेतली.त्यानंतर धुळे येथील वि.का. राजवाडे वस्तु संग्रहालयास भेट दिली. तेथील इतिहासकालीन दुर्मिळ वस्तूंचे निरीक्षण व त्यांच्या विषयी माहिती जाणून घेतली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद बोरसे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की. क्षेत्रभेटीमुळे अभ्यासाच्या कानातून आराम मिळतो, विविध सांस्कृतिक परंपरा व ठिकाणांची ओळख होते, सामाजिक कौशल्य निर्माण होते, निसर्गाची व पर्यावरणाची आवड निर्माण होते. सहलीचे आयोजनासाठी प्रा. निशा ठाकूर यांनी परिश्रम घेतले. तसेच प्रा. डॉ. एम. एस. उभाळे, प्रा. रविंद्र पाटील, प्रा. रवींद्र वळवी, प्रा. रेवती बागुल व प्रा. सुनिता वळवी यांनी सहकार्य केले तर प्रशासकीय सेवक कृष्णा बागुल, शंकर गिरासे, अमर राजपूत व वीरपाल गिरासे यांनी प्रयत्न केले.



