ताजा खबरे:
*अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य; युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट तीव्र निषेध नोंदविण्याचा इशारा*
*जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर-प्रमोद भामरे*
*क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवस मोहिम" 24 मार्च 2026 पासून राबविणे*
*रावल बी एड कॉलेजच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन*
*नंदुरबार तालुका विधायक समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध कला गुण दर्शन"कलाविष्कार "कार्यक्रम उत्सव संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवस मोहिम" 24 मार्च 2026 पासून राबविणे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवस मोहिम" 24 मार्च 2026 पासून राबविणे*

  • Share:

*क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवस मोहिम" 24 मार्च 2026 पासून राबविणे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत सरकार यांचेकडील मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत (NTEP) सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे "क्षयरोग मुक्त भारत" हे ध्येय ठेवण्यात आलेले आहे. याच अनुषंगाने, क्षयरोग दुरिकरणाच्या प्रयत्नांना अधिक गती देण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत "क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवस मोहिम" 24 मार्च 2026 रोजी "जागतिक क्षयरोग दिना" च्या निमित्ताने सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत क्षयरोग तपासणीत प्रामुख्याने केवळ लक्षणे असलेल्या रुग्णांच्या तपासणीवर अवलंबून न राहता, जोखीमग्रस्त (vulnerable) लोकसंख्येतील लक्षणे नसलेल्या व्यक्तींच्या सक्रिय तपासणी (active screening) करण्याचे ध्येय आहे. भारत सरकार यांचेकडील मार्गदर्शक सूचनेनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित विश्लेषणाद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील 238 गावे व नागरी प्रभाग (वॉर्ड) यांची जोखीमग्रस्त म्हणून निक्षय प्रणालीत नोंद करण्यात आली असून, सदर गावातील आदिवासी, शहरी तसेच जोखीमग्रस्त वस्त्या (congregate settings) येथे तपासणी करून क्षयरोगाचे लवकर निदान करून क्षयरोगाची साखळी खंडित करण्याचे ध्येय आहे. सदर मोहिमेअंतर्गत 238 जोखीमग्रस्त गावातील 1,13, 665 लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी, डॉ. मित्ताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नमन गोयल यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  नंदुरबार जिल्ह्यात "क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवस मोहिम" राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेअंतर्गत तपासणीसाठी जोखीमग्रस्त लोकसंख्येत AI- उपलब्ध हँडहेल्ड एक्स-रे यंत्रांचा वापर करण्यात येणार असून, मोबाईल मेडिकल युनिट्स (MMUs) व इतर वाहनांचे "निक्षय वाहन" म्हणून समुदायस्तरावर जनजागृती व तपासणीसाठी उपयोग करण्यात येणार आहे. आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये (AAMs) तसेच जोखीमग्रस्त गावात "आयुष्मान आरोग्य शिबिरे" आयोजित करून रक्तदाब (BP), BMI, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन तपासणी बरोबरच छातीचा एक्स-रे व NAAT तपासणी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, लोकप्रतिनिधी (सांसद, आमदार, पंचायत राज संस्था सदस्य व नागरी स्थानिक संस्था प्रतिनिधी) यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून जनजागृती वाढविणे, कलंक कमी करणे व समुदाय सहभाग वाढविणे हे या मोहिमेत अपेक्षित आहे. स्वयं सहायता गट, माय भारत स्वयंसेवक, उद्योग व व्यापारी संघटना, व्यावसायिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक उपक्रम, शैक्षणिक संस्था इत्यादींचा सहभागही या मोहिमेत घेण्यात येणार आहे तसेच  "निक्षय मित्र" यांच्या माध्यमातून रुग्णांना अन्नधान्य तसेच मानसिक-सामाजिक सहाय्य उपलब्ध करून देणे हे या मोहिमेत अपेक्षित आहे. सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी खालीलप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे, जोखीमग्रस्त गावे/प्रभागांची यादीः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) आधारे निश्चित केलेल्या आपल्या कार्यक्षेत्रातील जोखीमग्रस्त गावे आणि नागरी प्रभागा (वॉर्ड) यादी मधील सर्व ठिकाणी आयुष्यमान आरोग्य शिवीर भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आयोजित करण्यात येणार आहेत. सूक्ष्म कृती आराखडा (Micro-planning): मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणी साठी गाव व प्रभाग स्तरावरील सूक्ष्म कृत्ती आराखडा (Micro-planning) तयार केलेला असून आवश्यक ती पूर्वतयारी सुनिश्चित करण्यात आलेली आहे. साधन सामग्रीचे एकत्रीकरण (Pooling of Resources): मोहिमेसाठी आवश्यकतेनुसार आरोग्य विभागाव्यतिरिक्त इतर विविध विभागांकडील उपलब्ध मनुष्यबळ, वाहने आणि इतर साधनसामग्रीचे एकत्रिकरण (Pooling) करून त्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. विविध विभागांचा समन्वयः जिल्ह्यातील इतर सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून सर्वांचा अपेक्षित सहभाग घेऊन मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. नियमित आढावा व पर्यवेक्षणः मोहिमेच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासाठी बैठका आयोजित करणे, क्षेत्रीय स्तरावर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष पर्यवेक्षण (Supervision) सुनिश्चित करण्यात येणार आहे. विशेषत तपासणी शिबिरे आयोजित करणे, समुदायाचा सहभाग वाढविणे तसेच मोहिमेदरम्यान निक्षय पोर्टलवर रिअल-टाइम डेटा नोंदणी सुनिश्चित करणे यावर भर देण्यात येणार आहे.
या मोहिमेचे यश हे सर्व स्तरांवरील एकत्रित प्रयत्नांवर अवलंबून आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य; युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट तीव्र निषेध नोंदविण्याचा इशारा*
March, 23 2026
*जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर-प्रमोद भामरे*
March, 23 2026
*क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवस मोहिम" 24 मार्च 2026 पासून राबविणे*
March, 23 2026
*रावल बी एड कॉलेजच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन*
March, 23 2026
*नंदुरबार तालुका विधायक समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध कला गुण दर्शन"कलाविष्कार "कार्यक्रम उत्सव संपन्न*
March, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज