*‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, बारा हजाराहून अधिक विद्यार्थ्याथीनी व शिक्षकांन
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, बारा हजाराहून अधिक विद्यार्थ्याथीनी व शिक्षकांन
*‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, बारा हजाराहून अधिक विद्यार्थ्याथीनी व शिक्षकांनी घेतला प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ*
पुणे(प्रतिनिधी):-‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मिळणारे मार्गदर्शन केवळ मुलींसाठी कराटे प्रशिक्षण नसून एक स्वसंरक्षण, आत्मविश्वास व सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा उपक्रम म्हणून मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. सर परशुराम महाविद्यालय पुणे येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत आयोजित राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ .हेमंत वसेकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, संचालक योजना श्रीकृष्ण कुमार पाटील, एससीआरटी सहसंचालक तथा राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे राज्य समन्वयक डॉ. कमलादेवी आवटे, पुणे मनपा शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे उपाध्यक्ष अतुल तरवडे आदी उपस्थित होते.
भुसे म्हणाले, शिक्षण म्हणजे केवळ चार भिंतींमध्ये मिळणारे शिक्षण नसून आयुष्यातील प्रत्येक संकटांना धैर्याने तोंड देणारे शिक्षण असावे, याच बाबीचा विचार करुन आजच्या युगात मुलींनी आत्मरक्षा, आत्मसंरक्षणाचे उत्तम धडे गिरवविण्याकरिता शालेय शिक्षण विभागाने ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम’ हे विशेष अभियान सुरू आहे, आंतरराष्ट्रीय कराटे तज्ज्ञ लेजेंडरी ग्रँडमास्टर शेफुजी शौर्य भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात आले असून विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त ठरणार आहे, असेही भुसे म्हणाले. यावेळी प्रशिक्षणामध्ये हभप अक्षय महाराज भोसले यांनी "जीवन कौशल्य " विषयक तसेच आर्ट ऑफ लिविंग च्या मनीषा चंद्रा यांनी आत्मशांती व स्वनियंत्रण या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण वर्गासाठी पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपा या दोन्ही महानगर पालिकेच्या जवळपास 416 पेक्षा जास्त शाळांनी आणि 12 हजारापेक्षा जास्त विद्यार्थिनी आणि शिक्षक यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. पुणे विभागाचे उपसंचालक गणपत मोरे, पुणे मनपा शिक्षणाधिकारी डॉ. सुनंदा ठुबे, शिक्षण सहसंचालक हरून आतार, पुणे विभागाच्या सहसंचालक डॉ. ज्योती परिहार, प्राचार्य डॉ.विकास गरड, पुणे मनपा माध्यमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी आशा उबाळे, प्रशासनाधिकारी पिंपरी-चिंचवड मनपा सौ.संगीता बांगर, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक डॉ अरुण जाधव आदी उपस्थित होते.



