*सर्व नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे-जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सर्व नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे-जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी*
*सर्व नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे-जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्यातर्फे हवामान विभागाने तत्काळ इशारा दिला असून
दिनांक 19 मार्च 2026 वेळ 16. 30 वाजता (IST)
वैधता पुढील 3 तास भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्या सूचनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात तसेच शेजारील धुळे जिल्ह्यात हवामान परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
इशारा स्तर पिवळा
हवामान अंदाज
काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी तसेच ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाहणारे वादळी वारे होण्याची शक्यता आहे. प्रभावित क्षेत्र:
नंदुरबार जिल्हा
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
विजेच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली उभे राहणे टाळावे.
वादळी वाऱ्यांपासून संरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर जाणे टाळावे. सर्व नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केले आहे.