*अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात ग्रामस्थांचा संताप;परवाना रद्द करण्याची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात ग्रामस्थांचा संताप;परवाना रद्द करण्याची मागणी*
*अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात ग्रामस्थांचा संताप;परवाना रद्द करण्याची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ येथे स्वस्त धान्य दुकान चालवणाऱ्या नर्मदा महिला बचत गट यांच्या कामकाजावर गंभीर आरोप करण्यात आले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सदर बचत गटामार्फत चालवले जाणारे स्वस्त धान्य दुकानात नियमाप्रमाणे धान्य वितरण करत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. अनेक लाभार्थ्यांना पूर्ण प्रमाणात धान्य दिले जात नसून, दिलेल्या धान्याची पावती सुद्धा देण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिसरातील बहुतांश नागरिक हे गरीब व साधे जीवन जगणारे असून, त्यांच्या हक्काच्या धान्याबाबत होणाऱ्या या प्रकारामुळे त्यांना मोठा फटका बसत आहे. विशेष म्हणजे, याबाबत संबंधित दुकानदाराकडे जाब विचारला असता काही ग्रामस्थांना धमकावल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करून तो पात्र व प्रामाणिक बचत गटाकडे देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सर्व ग्रामस्थांनी नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. जर सदर स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना तात्काळ रद्द केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी डेब्रामाळ येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.



