*‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा विकास प्रतिभा केंद्राची स्थापना-सुनंदा पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा विकास प्रतिभा केंद्राची स्थापना-सुनंदा पाटील*
*‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा विकास प्रतिभा केंद्राची स्थापना-सुनंदा पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने “मिशन लक्षवेध” हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी अॅथलेटिक्स आणि हॉकी या दोन क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आली असून, जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र (DSTDC) स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. हे प्रशिक्षण केंद्र अनिवासी स्वरूपाचे असेल. ही केंद्रे प्रामुख्याने जिल्हा किंवा विभागीय क्रीडा संकुल परिसरात सुरू केली जातील. ज्या ठिकाणी ही सोय उपलब्ध नसेल, तिथे शासकीय, निमशासकीय किंवा अपवादात्मक परिस्थितीत खाजगी संस्थांच्या संकुलामध्ये ही केंद्रे उभारण्यात येतील.
अॅथलेटिक्स आणि हॉकी या खेळांसाठी खेळाडूंची निवड करताना खालील निकष लक्षात घेतले जातील, 31 डिसेंबर पर्यंत 21 वर्षांखालील मुले व मुली. खेळाडू महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. किमान राज्यस्तरावरील सहभाग किंवा पदक प्राप्त खेळाडू (शालेय किंवा अधिकृत क्रीडा संघटना स्पर्धा). गेल्या दोन वर्षांतील कामगिरीचे मूल्यमापन आणि फिटनेस चाचणीत पात्र होणे अनिवार्य आहे. शासनमान्य डॉक्टरांकडून दिलेले वैध फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे.
अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र (Domsicile), आधारकार्ड, गेल्या दोन वर्षांतील क्रीडा कामगिरी प्रमाणपत्रे, पासपोर्ट साईजचे 03 फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि पालकांचे संमती पत्र जोडणे आवश्यक आहे.
इच्छुक आणि पात्र खेळाडूंनी आपले अर्ज 02 एप्रिल 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जमा करावेत. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार 9850559509 यांच्याशी संपर्क साधावा.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घेऊन आपले क्रीडा कौशल्य विकसित करावे, असे आवाहनही जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.



