*गांधीनगरमध्ये सागबारा येथील ‘महाराष्ट्र आदिवासी भवन’ संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गांधीनगरमध्ये सागबारा येथील ‘महाराष्ट्र आदिवासी भवन’ संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक*
*गांधीनगरमध्ये सागबारा येथील ‘महाराष्ट्र आदिवासी भवन’ संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-गुजरात राज्यातील तीर्थक्षेत्र देवमोगरा माता (सागबारा) येथे महाराष्ट्र राज्याच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र आदिवासी भवना’ च्या बांधकामाबाबत आज गांधीनगर (गुजरात) येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भवनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस गुजरातचे पर्यटन राज्यमंत्री जयराम गामित, विधानसभेचे माजी अध्यक्ष व माजी मंत्री गणपत वसावा, गुजरात पर्यटन विभागाचे मुख्य सचिव समीर रावल आणि मुख्य अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने शिवसेनेचे संपर्कप्रमुख, आ. चंद्रकांत रघुवंशी आणि आ. आमश्या पाडवी या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत आ. चंद्रकांत रघुवंशी यांचे प्रतिनिधी म्हणून नंदुरबार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे आणि आर्किटेक्ट नीरज देशपांडे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी देवमोगरा माता संस्थानचे ट्रस्टी नानसिंगभाई वसावा, सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबारचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, कनिष्ठ अभियंता पवन बागुल यांनी तांत्रिक बाबींवर सादरीकरण केले. गुजरात, मध्य प्रदेशम, महाराष्ट्रातून देवमोगरा येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी हे आदिवासी भवन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यांतील संबंध अधिक दृढ होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



