*उंच भरारीकडे वाटचाल!मिशन गरुडझेप अंतर्गत “मिशन परिवर्धा” उपक्रम ठरला यशस्वी 4 थी शिष्यवृत्ती सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकडे भक्कम पाऊल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उंच भरारीकडे वाटचाल!मिशन गरुडझेप अंतर्गत “मिशन परिवर्धा” उपक्रम ठरला यशस्वी 4 थी शिष्यवृत्ती सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकडे भक्कम पाऊल*
*उंच भरारीकडे वाटचाल!मिशन गरुडझेप अंतर्गत “मिशन परिवर्धा” उपक्रम ठरला यशस्वी 4 थी शिष्यवृत्ती सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकडे भक्कम पाऊल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग नंदुरबार व जिल्हा प्राथमिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या मिशन गरुडझेप अंतर्गत “मिशन परिवर्धा” हा उपक्रम परिवर्धा केंद्रात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीपणे राबविण्यात आला. इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे, स्पर्धात्मक वातावरणाची सवय लावणे आणि परीक्षेची भीती दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. त्याअंतर्गत सराव परीक्षा घेण्यात आली असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावर्षी प्रथमच इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन होत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप समजावे, प्रश्नपत्रिकेची पद्धत कळावी तसेच OMR उत्तरपत्रिकेचा सराव व्हावा या हेतूने सराव परीक्षा आयोजित करण्यात आली. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मोठी मदत झाली.
केंद्रप्रमुख अशोक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे काटेकोर नियोजन करण्यात आले. मुख्य परीक्षेच्या धर्तीवर A व B असे दोन संच, तसेच OMR उत्तरपत्रिका वापरून परीक्षा घेण्यात आली. केंद्रसंचालक अमृत पाटील यांनी शिस्तबद्ध नियोजन करून संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडली. या सराव परीक्षेत जि.प. प्राथमिक शाळा परिवर्धा, कलमाडी, तऱ्हाडी त. बो., काथर्दे दिगर, काथर्दे खु., काथर्दे दिगर पुनर्वसन, कलसाडी, वाघोदा, सोनवल त. बो., कोठली व ठेंगचे अशा एकूण 11 शाळांमधील 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये
प्रथम सर्वजित ठाकरे (परिवर्धा)
द्वितीय श्रद्धा ठाकरे (परिवर्धा) तृतीय भाग्यश्री वडार (काथर्दे खु.)
चतुर्थ पल्लवी गिरासे (कलमाडी)
पंचम बादल हटेला (तऱ्हाडी त. बो.)
या विद्यार्थ्यांची तालुका स्तरावरील शिष्यवृत्ती सराव परीक्षेसाठी निवड करण्यात आली.
या उपक्रमासाठी परिवर्धा केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शहादा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे व शिक्षण विस्तार अधिकारी डी. डी. राजपूत यांनी उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
सराव परीक्षेसाठी माध्यमिक शाळेचे अर्पित चौधरी, गजानन मराठे, छोटू पाटील, नितीन पाटील व अनिता पाटील यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच तज्ञ मार्गदर्शक शक्ती धनके, लक्ष्मीपुत्र उप्पीन, ज्ञानोबा सुरनर व मनोज राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.
एकूणच, “मिशन परिवर्धा” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अत्यंत प्रभावी ठरत असून भविष्यात अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळविण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे शहादा तालुका अध्यक्ष तुकाराम अलट यांनी व्यक्त केला.



