*गॅस सिलिंडरची दरवाढ रद्द करा, अन्यथा गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात आंदोलन, बिरसा फायटर्सचा इशारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गॅस सिलिंडरची दरवाढ रद्द करा, अन्यथा गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात आंदोलन, बिरसा फायटर्सचा इशारा*
*गॅस सिलिंडरची दरवाढ रद्द करा, अन्यथा गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात आंदोलन, बिरसा फायटर्सचा इशारा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-गॅस सिलिंडरच्या किंमतीत केलेली दरवाढ तात्काळ रद्द करा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून केंद्रीय पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्री हरपित सिंह पुरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचे निवेदन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठवले आहे. मार्च 2026 मध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 60 रूपये ची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर दर 913 झाला असून व्यवसायिक गॅस सिलिंडर 115 रुपयांनी महाग झाला आहे. इराण व अमेरिका या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारने अचानक पणे वाढ केलेली आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना व व्यावसायिकांना बसला आहे. गॅस सिलिंडरच्या दर वाढीमुळे सर्व सामान्य माणसांच्या घरात पुर्वी सारखे चूलीवर जेवण बनवायला सुरुवात झाली असून गॅस गायब होत आहेत व व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्यामुळे छोटे व्यावसाय, हाँटेल्स, खानावळी बंद कराव्या लागत आहेत. एकीकडे सरकार लाडकी बहिण योजनेतून 1500 रूपये महिलांना देऊन दिंडोरा पिटत आहे, तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडर दरवाढ करून लाडक्या बहिणीला पुन्हा चूलीवर जेवण बनवायला लावून रडवत आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे महिला, सर्व सामान्य व व्यावसायिकांमध्ये सरकार विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनता गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात आक्रोश व्यक्त करत आहेत. तरी गॅस सिलिंडरच्या किमतीत केलेली दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी. अन्यथा सरकारच्या या गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने सरकारला दिलेला आहे.



