ताजा खबरे:
*नंदुरबार येथे लाडकांना मंगल कार्यालयात श्री झुलेलाल सेवा मंडळमार्फत आरोग्य तपासणी शिबिर*
*स्काऊट-गाईड चळवळीमुळे विद्यार्थ्यांत शिस्त, स्वावलंबन व देशसेवेची भावना विकसित– सहाय्यकजिल्हाधिकारी शिवांश सिंह*
*एम.के.डी.टॅलेंट हंट स्पर्धेत देवरे विद्यालयाचे विद्यार्थ्यांना सुयश*
*नायगांव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी 338 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा*
*खापर ग्रामपंचायत कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*स्काऊट-गाईड चळवळीमुळे विद्यार्थ्यांत शिस्त, स्वावलंबन व देशसेवेची भावना विकसित– सहाय्यकजिल्हाधिकारी शिवांश सिंह*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*स्काऊट-गाईड चळवळीमुळे विद्यार्थ्यांत शिस्त, स्वावलंबन व देशसेवेची भावना विकसित– सहाय्यकजिल्हाधिकारी शिवांश सिंह*

  • Share:

*स्काऊट-गाईड चळवळीमुळे विद्यार्थ्यांत शिस्त, स्वावलंबन व देशसेवेची भावना विकसित– सहाय्यकजिल्हाधिकारी शिवांश सिंह*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या संदर्भानुसार तसेच नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक) व भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने कब मास्तर प्राथमिक प्रशिक्षण शिबीर व फ्लॉक लिडर प्राथमिक प्रशिक्षण शिबीर यांचे आयोजन दिनांक 9 मार्च ते 15 मार्च 2026 या कालावधीत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा ढोंगसागळी ता. नवापुर जि. नंदुरबार येथे करण्यात आले होते. स्काऊट-गाईड चळवळीचे जनक व जागतिक मुख्य स्काऊट लॉर्ड बेडन पॉवेल आणि गर्ल गाईड्स जागतिक मुख्य गाईड लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या शुभहस्ते स्काऊट -गाईड ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी स्काऊट-गाईड चळवळीच्या आदर्शांचे स्मरण करून शिस्त, स्वावलंबन, सेवा आणि देशभक्तीची भावना जोपासण्याचा संकल्प केला.
नंदुरबारचे सहाय्यक जिल्हाधिकारी शिवांश सिंह यांनी स्काऊट-गाईडच्या प्रशिक्षणस्थळी भेट देऊन उपस्थित  कब मास्तर व फ्लॉक लीडर शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिस्त, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना विकसित करण्यासाठी स्काऊट-गाईड चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणातून मिळणाऱ्या कौशल्यांचा दैनंदिन जीवनात उपयोग करावा असे आवाहन केले. नंदुरबार जिल्हा मुख्य आयुक्त तथा जिल्हा परिषद नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या मार्गदर्शनाने कब विभाग जीवन मटके एल.टी. कब मुंबई, मोहन निकम एल.टी. कब सांगली धुळे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त चैत्राम निकम ए.एल.टी स्काऊट, धुळे जिल्हा एच. डब्ल्यू. बी कब जितेंद्र आव्हाड, नंदुरबार जिल्हा एच.डब्ल्यू.बी कब संदीप पाटील बुलबुल विभाग नंदुरबार जिल्हा संघटक संगीता रामटेके एल.टी बुलबुल, नंदुरबार जिल्हा सुषमा फुलंब्रीकर ए.एल.टी गाईड एच. डब्ल्यू. बी. कल्पना गवळे आदी प्रशिक्षणास मार्गदर्शक म्हणून लाभले. प्रशिक्षण शिबीरासाठी
नंदुरबार जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट हेमंत पाटील, नंदुरबार जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड छाया पाटील, नंदुरबार जिल्हा संघटन आयुक्त महेंद्र वसावे, नंदुरबार जिल्हा कार्यालय वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर सावंत, कनिष्ठ लिपिक योसेफ गावीत आदींनी नियोजन व आयोजन केले. कब विभाग एल.टी. कब मुंबई जीवन मटके यांनी प्रशिक्षण दरम्यान मार्गदर्शन करताना सांगितले की, स्काऊटिंगला “सेवेचे स्वरूप” असे संबोधत निःस्वार्थ सेवेच्या भावनेच्या विकासावर विशेष प्रकाश टाकला. ते म्हणाले की, लहान मुलांच्या मनात संस्कार आणि यशाचे बीजारोपण करणारे तुम्हीच आहात. शिक्षकांनी केलेले कार्य मुलांच्या आयुष्यावर अमिट छाप सोडते. तुमचे प्रत्येक शब्द त्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यास आकार देतात. तुमच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा मुलं जगाशी परिचित होऊ लागतात, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नेतृत्व कौशल्य विकसित होऊ लागते. त्यामुळे आपली जबाबदारी आणखी वाढते. आजच्या काळात फक्त अभ्यासच नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवणे ही काळाची गरज आहे. कथा लेखन, वाचन, खेळ व विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्याबरोबरच नैतिक मूल्येही विकसित करता येतात. यात भारत स्काउट आणि गाईड चळवळीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. स्काउट - गाईड उपक्रमांतर्गत युनिफॉर्म, युनिट नोंदणी, चतुर्थ चरण, हीरक पंख, राज्य पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार, गोल्डन ॲरो, दक्षता बॅज इत्यादी बाबींची माहिती अतिशय रंजक पद्धतीने सांगण्यात आली. भारत स्काउट अँड गाईड ही अशी संघटना आहे जी विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध, जबाबदार आणि सक्षम बनवते. शेवटी त्यांनी सांगितले की, सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनवण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक जीवनाला यशस्वी करण्यासाठी सतत मार्गदर्शन करणे हीच खरी सेवा आहे. असेही माहिती दिली.
सदर प्रशिक्षण शिबिरात शासकीय व अनुदानित प्राथमिक आश्रम तसेच जिल्हा परिषद शाळांमधील अप्रशिक्षित शिक्षक व शिक्षिका यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धुळे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त चैत्राम निकम यांनी प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रशिक्षणामध्ये स्काऊट-गाईड चळवळीची मूलतत्त्वे, शिस्त, नेतृत्वगुण, गटकार्य, शारीरिक व बौद्धिक विकास, शिबीर जीवनशैली तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वावलंबन व सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्काऊट - गाईड प्रशिक्षण शिबिर हे अतिशय शिस्तबद्ध, ज्ञानवर्धक व आनंददायी होते. शिबिरामध्ये आमचे मार्गदर्शक, षटकातील सदस्य, तसेच विविध तालुक्यातील आलेले प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. शिबिराच्या सुरुवातीला शिबिराचे नियम, शिबिराचे उद्देश व शिबिरातील दिनचर्या यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
दररोज सकाळी प्रार्थना, व्यायाम, ध्वजारोहण व शिस्तबद्ध संचलन याने दिवसाची सुरुवात होत असे. त्यानंतर शिबिरातील रोजची कामे, स्वच्छता, समूहकार्य व विविध उपक्रम राबविण्यात येत होते. स्काऊट- गाईडची मूलतत्त्वे, बी.पी. यांचे जीवनचरित्र, स्काऊटचे नियम, वचन व ध्येय यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्काऊट प्रार्थना, स्काऊट झंडागीत, शेकोटी गीत यांचा सराव करून घेतला. शपथविधी, कबिंगची उत्पत्ती, कबचे नियम, वचन, ध्येय, कब प्रार्थना, वंदन, हस्तांदोलन, कबचा गणवेश व जंगी आरोळी यांची माहिती देण्यात आली. तसेच लहान मुलांच्या गरजा, आवडी, स्वभाव, तसेच कब मास्टरची पात्रता, जबाबदारी व कर्तव्य यावर मार्गदर्शन झाले. शिबिरात सुरक्षितता व वाहतुकीचे नियम, मागाच्या खुणा, राष्ट्रध्वज, स्काऊट-गाईड ध्वज, विश्व स्काऊट ध्वज यांची माहिती देण्यात आली. द्वितीय, तृतीय व चतुर्थ चरण अभ्यासक्रम, पॅक मीटिंग कशी घ्यावी, गाठी बांधणे, फावल्या वेळेतील उपक्रम यावर प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
हे शिबिर माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. या शिबिरामुळे शिस्त, स्वावलंबन, सहकार्य, नेतृत्व व देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली. अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. शिबिरादरम्यान विविध प्रात्यक्षिके, खेळ, गीते, ध्वजवंदन, शिस्तबद्ध संचलन, प्रार्थना, गाठी- गुंडाळ्या, शिबीर नियम, दैनंदिन कार्यक्रम यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सहभागी शिक्षक- शिक्षिकांनी प्रशिक्षणाचा मनापासून लाभ घेतला. शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रेखा पवार यांनी भेट देऊन स्काऊट गाईड प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले. खांडबारा केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभू वळवी, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा  ढोंगसागाळी प्राचार्य पाऊल गावित, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत आदी उपस्थित होते. हे प्रशिक्षण शिबीर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले असून सर्व सहभागींच्या सहकार्यामुळे शिबीर उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार येथे लाडकांना मंगल कार्यालयात श्री झुलेलाल सेवा मंडळमार्फत आरोग्य तपासणी शिबिर*
March, 15 2026
*स्काऊट-गाईड चळवळीमुळे विद्यार्थ्यांत शिस्त, स्वावलंबन व देशसेवेची भावना विकसित– सहाय्यकजिल्हाधिकारी शिवांश सिंह*
March, 15 2026
*एम.के.डी.टॅलेंट हंट स्पर्धेत देवरे विद्यालयाचे विद्यार्थ्यांना सुयश*
March, 15 2026
*नायगांव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी 338 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा*
March, 14 2026
*खापर ग्रामपंचायत कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न*
March, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज