*खापर ग्रामपंचायत कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खापर ग्रामपंचायत कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न*
*खापर ग्रामपंचायत कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, आज अक्कलकुवा तालुक्यातील खापर ग्रामपंचायत कार्यालयात अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली " छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर "संपन्न झाले. यावेळी तहसीलदार विनायक घुमरे, शिवसेना सह संपर्क प्रमुख लक्ष्मन वाडिले, विनोद कामे, लोकनियुक्त सरपंच किरण पाडवी, उपसरपंच देवा वसावे, सरला वळवी, पुरवठा अधिकारी निलिमा काळमेगे, पल्लवी इंगळे, अंकिता मावची, प्रदीप पाडवी, तलाठी संदीप तडवी, ग्रामविकास अधिकारी विनोद ढोडरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी आशा भोई, सोनु ईशी, प्रदीप पाडवी, स्विय सहाय्यक रविंद्र गुरव तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते
या शिबिराच्या माध्यमातून शिबीर स्थळी 15 पेक्षा जास्त महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, प्रलंबित फेरफार, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती,डिजीटल स्वाक्षरीचे 7/12 आणि 8-अ उताऱ्याचे वाटप उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजुर करणे, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप घरांसाठी पट्टे वाटप, ई मोजणी, सिकलसेल, रेशनकार्ड तसेच इतर योजनांचा लाभ देण्यात आला
या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केले कार्यक्रमांचे प्रास्ताविक तहसीलदार विनायक घुमरे यांनी तर सूत्रसंचालन मोगीलाल चौधरी यांनी केले. या शिबिरामध्ये खालील प्रमाणे दाखले किंवा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महसूल विभाग- उत्पन्न दाखले वाटप 22, सातबारे 62, अधिवास प्रमाणपत्र 3, जातीचा दाखला 2, रेशन कार्ड 86 वाटप करण्यात आले. ST महामंडळ NCMC 15 वाटप, कृषि विभाग DBT Tractor प्रमाणपत्र 3 वाटप, भूमी अभिलेख सनद 10 वाटप, सेतू सुविधा- आधार दुरुस्ती 15, विविध अर्ज वाटाप 322, आरोग्य विभाग- सिकलसेल तपासणी 19, BP 62, Sugar 66, वयोश्री 28, तपासणी केल्या
या प्रमाणे दाखले/प्रमाणपत्रे वाटप केले.



