*हातकणंगले पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोध*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हातकणंगले पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोध*
*हातकणंगले पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोध*
घुणकी(प्रतिनिधी):-तालुक्यातील काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युतीला घवघवीत यश मिळाले.22 सदस्य संख्या असणाऱ्या हातकणंगले पंचायत समितीमध्ये शिवसेना भाजपाचे तब्बल 17 सदस्य निवडून येत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानुसार आज सभापती व उपसभापती निवडी खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व जिल्हाप्रमुख रवींद्र माने, मा.जि.प सदस्य अरुण इंगवले, सभापती राजेश पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांच्या पुढाकाराने व सहकार्याने बिनविरोध पार पडल्या. निवडणूक प्रक्रिया तहसीलदार सुशील बेलेकर, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली हातकणंगले पंचायत समिती सभागृहात पार पडली. निवडीनंतर नूतन सभापतीपदी व उपसभापतीपदी यांना आमदार डॉ. सुजित मिणचेकर संचालक गोकुळ दूध संघ, कोल्हापूर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत जि.प. सदस्य अतिश शिंगे, वर्षाताई सावर्डेकर, शिवाजी जाधव, जि.प सदस्य प्रसाद खोबरे,बीसरपंच अजिंक्य इंगवले, राजु इंगवले, अनिल बिरांजे, अमर इंगवले, विजय भोसले, अमोल कोरे, झाकीर भालदार, पापा सनदी, गोगा बाणदार, किसन तिरपणकर, आनंदा मोरे, तसेच शिवसेना भाजप महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



