*जि.प. शाळा भाबलपुर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जि.प. शाळा भाबलपुर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा*
*जि.प. शाळा भाबलपुर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-जि.प. शाळा भाबलपुर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला. अक्कलकुवा तालुक्यातील जि. प. शाळा भाबलपुर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला, कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिनेश पाडवी होते. शिक्षकवृंद, माता पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपीका पाडवी व सुनीता वसावे यांच्या हस्ते करण्यात आले. आलेल्या महिला प्रतिनिधींचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच इतर महिलांना पेन देऊन त्यांच्यादेखील सत्कार करण्यात आला. सहशिक्षक सुभाष पाडवी महिला दिनाचे महत्व विविध पुरस्कारित महिलांच्या उदाहरणासह समजावून दिले. तद्नंतर सहशिक्षिका निर्गुना नाईक विद्यार्थ्याच्या प्रगती मध्ये माता पालकांचा सहभाग कश्याप्रकारे प्रभाव करतो व रोज त्यांच्याशी हितगुज साधणे याबाबतीत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री.दिनेश पाडवी सरांनी सावित्रीबाई फुले यांच्या कठोर परिश्रमाचे मोल पटवून दिले, आजूबाजूच्या परिसरातील महिला वर्ग उद्योग सुरू करून स्वतःचे स्वप्न पूर्ण करत आहेत व मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील करताहेत, तसेच जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या उदाहरणातून महत्त्व स्पष्ट केले, गावातील सरपंच, चंपा पाडवी, अंगणवाडी सेविका इ. ची उदाहरणे दिली. त्यानंतर आलेल्या महिला पालक वर्गाला विनंती केल्यास श्रीमती. मंदा पाडवी व सुनीता वसावे विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल, त्या कश्याप्रकारे पाल्याकडे लक्ष देतात, स्वतःचे कर्तव्य याबाबत मत मांडले. यावेळी ग्रामस्थ व देखील उपस्थित होते.



