*पथराई येथे आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी व महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पथराई येथे आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी व महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा*
*पथराई येथे आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी व महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील पथराई येथे आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी व महिला कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने खेडेगावीत शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय महिला दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेच्या संचालिका इला राजेंद्रकुमार गावित उपस्थित होत्या, प्रमुख अतिथी म्हणून गंगोत्री फाउंडेशन शहादाच्या संचालिका सौ प्रीती अभिजीत पाटील, मुख्य कायदेशीर व बचाव सल्लागार ॲड.सीमा खत्री, हि गो. श्रॉफ हायस्कूलच्या प्राचार्य श्रीमती सुषमा शाह, माजी नगरसेविका प्रमिला चौधरी, माजी विस्तार अधिकारी प्रकल्प विभाग शैलाताई वळवी, यहामेर हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर प्रतिभा वळवी, अंगणवाडी सुपरवायझर दमयंती वळवी, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव विभूती गावित, ऋषिका गावित या उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी महिला सक्षमीकरणाची थीम ठरवून अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गुजराती पेहराव करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. त्यानंतर सर्व अतिथी व मान्यवरांचे पुस्तक स्नेह वस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर अनिता तलवारे व सुवर्णा भामरे त्यांनी नृत्यातून गणेश वंदना सादर केली. त्यानंतर ए एन एम च्या एका विद्यार्थिनींनी आपली मुलांवरील कविता सादर केली. त्यानंतर इंग्लिश मीडियम च्या विद्यार्थिनींनी सुंदर अशा नाट्य नृत्यातून मुलींची समाजातील स्थिती तर होणारे कुटुंबापासून तर समाजापर्यंतचे अन्याय व सहनशक्ती संपल्यानंतरची स्त्री शक्ती अतिशय प्रभावीपणे प्रस्तुत केली त्यानंतर महिला कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेली रॅम्प वॉक स्पर्धा घेण्यात आली. अतिशय सुंदर रीतीने गुजराती पोशाख परिधान केलेल्या व स्पर्धकांनी अतिशय उत्साह पूर्ण असे प्रदर्शन केले. या स्पर्धकांना प्रति थीम वरील प्रश्न विचारून प्रथम व द्वितीय व तृतीय विजयी स्पर्धक ठरवण्यात आले
संस्थेतील महिला स्वयंपाकी व कामठी कर्मचारी यांनीही अतिशय उत्साहाने या रॅम्प वॉक मध्ये भाग घेतला, त्यानंतर सर्वांसोबत आनंद द्विगुणीत करत सर्व मान्यवरांनी ही रॅम्प वॉक केले. व कार्यक्रमात शोभा निर्माण केली.
यानंतर महिला कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेली रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धेचे मान्यवरांकडून परीक्षण करण्यात आले प्रथम द्वितीय क्रमांकाचे विजेते काढण्यात आले.
श्रॉफ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुषमा शाळा यांनी कार्यक्रमासाठी संस्थेचे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. प्रीती पाटील यांनी आपल्या मनोगतातून सकारात्मक विचारच कोणत्याही स्त्रीला यशाच्या शिखरावर नेतो असा मोलाचा संदेश दिला. सीमा खत्री मुख्य कायदेशीर व बचाव सल्लागार नंदुरबार यांनी एक स्त्री ही वेगवेगळ्या भूमिका निभवतांना समाजाला चांगली दिशा कशी देऊ शकते हे प्रतिपादन केले. संस्थेच्या सचिव विभूती गावित यांनी मुलांनी स्वतःवरचा आत्मविश्वास नेहमी जागृत ठेवावा असे सांगितले
तसेच संस्थेच्या सचिव माननीय ऋषीका गावित यांनी तो महिला कर्मचाऱ्यांना आपले कार्य निष्ठेने पूर्ण केल्यास त्यात नक्कीच यश मिळते असा मुलाचा संदेश दिला. यानंतर साठी आयोजित करण्यात आलेले फनी गेम्स घेण्यात आले व सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ ईला गावित यांनी महिलांना शुभेच्छा देत कार्यक्रमासाठी केलेल्या सजावटीचे कौतुक केले
अशाप्रकारे महिला दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन पोर्णिमा पाडवी व रजनी करेले यांनी केले. त्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.



