*महिलांच्या आरोग्यासाठी मिलेटचे महत्त्व अधोरेखित– भारतीय स्त्री शक्ती शाखा नंदुरबारतर्फे महिला दिन साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महिलांच्या आरोग्यासाठी मिलेटचे महत्त्व अधोरेखित– भारतीय स्त्री शक्ती शाखा नंदुरबारतर्फे महिला दिन साजरा*
*महिलांच्या आरोग्यासाठी मिलेटचे महत्त्व अधोरेखित– भारतीय स्त्री शक्ती शाखा नंदुरबारतर्फे महिला दिन साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय स्त्री शक्ती शाखा नंदुरबार यांच्या वतीने श्रीजी वाचनालय, नंदुरबार येथे महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्य, पोषण आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मिलेट (भरड धान्य) विषयावर जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय स्त्री शक्ती शाखा नंदुरबारच्या अध्यक्षा डॉ. वैशाली चव्हाण यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात भारतीय स्त्री शक्ती संस्थेची उद्दिष्टे आणि महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महिलांचे सक्षमीकरण, आरोग्यविषयक जागरूकता, सामाजिक सहभाग आणि स्वावलंबन यासाठी भारतीय स्त्री शक्ती शाखा सातत्याने विविध कार्यक्रम आयोजित करत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी अशा उपक्रमांचा लाभ घेऊन समाजात अधिक सक्षमपणे पुढे यावे, असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी भारतीय स्त्री शक्ती शाखेच्या संघटक कल्याणी डांगे कार्यकमाला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथील शास्त्रज्ञ सौ. आरती देशमुख यांनी मिलेट विषयावर पीपीटीच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांना सोप्या व समजण्यासारख्या भाषेत मिलेटचे पोषणमूल्य, आरोग्यासाठी असलेले फायदे, तसेच मिलेटचे विविध प्रकार यांची माहिती दिली. ज्वारी, बाजरी, नाचणी, कोदो, कुटकी, सांवा यांसारख्या भरड धान्यांचे महत्त्व आणि त्यांचे उत्पादन याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय मिलेटपासून तयार होणारे विविध पौष्टिक पदार्थ जसे की भाकरी, लाडू, खिचडी, उपमा, धिरडे, बिस्किटे तसेच इतर मूल्यवर्धित पदार्थ यांची माहिती देत महिलांनी आपल्या दैनंदिन आहारात मिलेटचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले. मिलेटच्या सेवनामुळे कुटुंबाचे आरोग्य सुधारते आणि कुपोषणासारख्या समस्यांवरही मात करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
सादरीकरणानंतर उपस्थित महिलांनी मिलेटच्या लागवडीबाबत, वापराबाबत आणि त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांबाबत विविध प्रश्न विचारले. प्रमुख वक्त्यांनी या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत महिलांशी संवाद साधला. त्यामुळे कार्यक्रम अधिक माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयंती देशपांडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. प्राची यार्दी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. ज्योती कळवणकर आणि अंजली वणी यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या आरोग्य, पोषण आणि सक्षमीकरणाबाबत जनजागृती करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



