*कांशीराम जी यांच्या जयंतीनिमित्त, रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कांशीराम जी यांच्या जयंतीनिमित्त, रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर*
*कांशीराम जी यांच्या जयंतीनिमित्त, रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर*
नांदेड(प्रतिनिधी):-बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त नांदेड येथे रविवार 15 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने मयूर टॉकीज, नाईकनगर, नांदेड येथे आयोजित या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन युवा उद्योजक प्रवीण जेठेवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भारतातील सहा हजार जातीना जोडून बहुजन समाजाची संकल्पना मांडणारे मान्यवर कांशीराम जी यांची प्रेरणा घेऊन "अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद" ही अराजकीय सामाजिक संघटना आपली वाटचाल सुरु ठेवणार आहे, याबद्दल सविस्तर विचारविनिमय या शिबिरातून करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता वेळेवर शिबीर सुरु होणार असून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.



