*श्रावणी येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान मेळावा; विविध योजनांबाबत मार्गदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रावणी येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान मेळावा; विविध योजनांबाबत मार्गदर्शन*
*श्रावणी येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान मेळावा;विविध योजनांबाबत मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार व महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील श्रावणी येथील आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेतीपूरक व्यवसाय तसेच शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात शेती, कोंबडीपालन, बकरीपालन, सेंद्रिय शेती तसेच इतर कृषीपूरक व्यवसायांविषयी तज्ज्ञांनी माहिती दिली. तसेच कृषी विषयक विविध तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीतील नव्या पद्धती आणि उत्पादन वाढविण्याच्या उपाययोजनांची माहिती मिळाली.
या कृषी विज्ञान मेळाव्यात कृषी विज्ञान केंद्र नंदुरबारचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. अश्विन राठोड (पशुवैद्यक शास्त्रज्ञ), राजेश भावसार (फार्म मॅनेजर), डॉ. योगेश सोंदावले (शास्त्रज्ञ), दीपक पाटील (कृषी संशोधन सहाय्यक), डॉ. विलास थोरात (कृषिवैज्ञानिक), डॉ. प्रशांत बोडके (संगणक संशोधन) तसेच डॉ. लक्ष्मण नागडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणलोट समितीचे अध्यक्ष संदीप कोकणी होते. तसेच पाणलोट समितीचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाडवी (सोशल मोबिलायझर) यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निमेश गावित (JRF) यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाला परिसरातील अनेक शेतकरी, महिला बचत गट सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेऊन या मेळाव्याचा लाभ घेतला.



