*आयएमएतर्फे सीएमई कार्यक्रम, महिला दिन साजरा व नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आयएमएतर्फे सीएमई कार्यक्रम, महिला दिन साजरा व नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ*
*आयएमएतर्फे सीएमई कार्यक्रम, महिला दिन साजरा व नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) तर्फे 7-8 मार्च 2026 रोजी हॉटेल पीजी सन्स येथे सीएमई कार्यक्रम व पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उत्साहात पार पडला. वैज्ञानिक सत्रात डॉ. सुरेश पाटील, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन (पुणे) यांनी “Advancements in Joint Replacement Surgery: What’s New in 2026” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच आरंभ स्पीच अँड ऑडिओलॉजी सेंटर, मुंबई यांच्या वतीने श्रवण आरोग्याबाबत माहितीपूर्ण सत्र घेण्यात आले. “Healthy Families, Healthy Futures – Preventive Health & Lifestyle Tips”** या विषयावर आयोजित पॅनल चर्चेत डॉ. वृषाली पाटील, डॉ. राजेश वसावे, डॉ. सचिन खलाने, डॉ. भरत चौधरी, डॉ. शिरीष शिंदे, डॉ. राजेश कोळी, डॉ. सुजाता पटेल, डॉ. रोहित पटेल आणि डॉ. स्वागत शाह यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य व निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात धनोरा ग्रामीण रुग्णालयातील डॉ. प्रीती पटले यांना त्यांच्या सेवेसाठी स्पेशल रिकग्निशन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. जयंत शाह, डॉ. अनिल शाह, डॉ. राजेश कोळी, डॉ. तेजस्विनी कोळी आणि डॉ. अर्चना वळवी यांना वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी मेडिकल एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी IMA Young Achiever Award देऊन डॉ. सारंग सुधीर देसाई (MS Ortho), डॉ. नील जयंत शाह (MD Radio), डॉ. सानिका राजकुमार पाटील (MD, DNB Skin & VD), डॉ. अभिजीत चिंतामणी महाजन (MS, MCh Ortho), डॉ. प्रियांक सुनील शाह (MD, DrNB Gastro) आणि डॉ. ऐश्वर्या शाह (DGO, DNB Obgy) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला असून डॉ. राजेश कोळी यांनी अध्यक्षपदाची तर डॉ. दीपक पटेल यांनी उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. World Hearing Awareness Week निमित्त “आओ गाव चलें” उपक्रमांतर्गत धनोरा ग्रामीण रुग्णालयात मोफत ऑडिओलॉजी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. हे शिबिर आरंभ स्पीच अँड ऑडिओलॉजी सेंटर, मुंबई यांच्या सहकार्याने पार पडले असून रुग्णांची मोफत श्रवण तपासणी करण्यात आली.
हा कार्यक्रम IMA अध्यक्ष डॉ. राजेश वसावे, सचिव डॉ. स्वागत शाह आणि खजिनदार डॉ. गणेश पाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.



