*हसोळ येथे आज शिमगोत्सवानिमित्त "कोकणचा साज, संगमेश्वरी बाज" कार्यक्रमाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हसोळ येथे आज शिमगोत्सवानिमित्त "कोकणचा साज, संगमेश्वरी बाज" कार्यक्रमाचे आयोजन*
*हसोळ येथे आज शिमगोत्सवानिमित्त "कोकणचा साज, संगमेश्वरी बाज" कार्यक्रमाचे आयोजन*
राजापूर(प्रतिनिधी):-कोकणातील गावागावात शिमगोत्सव उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा होत असून तालुक्यातील मौजे हसोळ गावात शिमगोत्सवाचे औचित्य साधून 11 मार्च 2026 रोजी सायं 4 वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने "कोकणचा साज संगमेश्वरी बाज" हा लोकप्रिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम हा श्री नवलादेवी चव्हाटा, होळीचा मांड हसोळ तर्फ सौंदळ ता. राजापूर येथे होणार आहे या शुभ प्रसंगी भक्त भाविकांनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नवलादेवी ग्रामस्थ मंडळ, हसोळ यांनी केले आहे.