*कोंडतिवरे शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोंडतिवरे शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
*कोंडतिवरे शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न*
राजापूर(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा येथे 5 मार्च 2026 रोजी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओझर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच विकास रेगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित जि. प. सदस्य प्रतीक मटकर आणि पं. स. राजापूरचे नवनिर्वाचित सदस्य उमेश पराडकर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच अमरेश तरळ, ओझर केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र मोरे गुरुजी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. स्वप्ना तरळ, उपाध्यक्ष किशोरकुमार ताम्हणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संजय कुळये यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, समूहनृत्य, नाटिका, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे उपस्थित मान्यवर व पालकांनी मनापासून कौतुक केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबतच कला, क्रीडा आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांनी आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.



