*कोकण कट्टा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 2026 संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकण कट्टा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 2026 संपन्न*
*कोकण कट्टा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 2026 संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त कोकण कट्टा विलेपार्ले आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले गेली 16 वर्ष सातत्याने या स्पर्धेचे आयोजन मुंबई तसेच रत्नागिरी येथे करण्यात येते. यंदा लांजा येथे पाच शाळांमध्ये तसेच गुहागर येथील पाचहून अधिक शाळांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच मुंबईतील गोरेगाव येथील महाराष्ट्र विद्यालय ही स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा होती लिखाणासाठी मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकर यांच्या माहितीचा लिखित मजकूर देण्यात आला होता तसेच लिखाणासाठी एक कागद देण्यात आला होता सुमारे दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सोळा वर्षे सातत्याने होत आहे विजयी स्पर्धकाला विध्यार्थी अक्षरभूषण ठरवून सन्मानचिन्ह आणि प्रशासकीय पत्रक देण्यात येते.



