*कालिकाई क्रिकेट संघ तारळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कालिकाई क्रिकेट संघ तारळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न*
*कालिकाई क्रिकेट संघ तारळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील तारळ येथील कालिकाई क्रिकेट संघ आयोजित क्रिकेट स्पर्धा रविवार 1 मार्च रोजी घाणी तलाव मैदान (विरार) येथे विलासदादा मुळम आणि प्रकाश मुळम यांच्या अध्यक्षते खाली पार पडली भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे तारळ प्रिमियर लीगचे पर्व 1 ले होते या स्पर्धेत गावातील एकूण 96 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धे मागील उद्देश असा की मुंबई नगरीत असलेल्या तारळ गावातील तरुणाईला एकत्र आणण्यासाठी होता. या स्पर्धेच्या माध्यमातून गावातील गुणवंत खेळाडूंना उच्च स्थरीय स्पर्धा खेळण्यासाठी संधी मिळावी. तारळ प्रिमियर लीग पर्व 1 ले चा विजेता गवळदेव इलेव्हन हरचिली आणि उपविजेता वंटू सेल्फी रायडर विजेता आणि उपविजेता संघांचे अभिनंदन, स्पर्धेतील मालिकावीर संकेत मोंडे तसेच उत्कृष्ट गोलंदाज मनिष कुवरे, उत्कृष्ट फलंदाज निकेत नानारकर. या स्पर्धेला उपस्थित प्रमुख मान्यवर विलासदादा मुळम, प्रकाशदादा मुळम, राजाराम कुवरे, गाव प्रमुख कुणाल मुळम, प्रशांत कदम, अनिल भोवड, विरार नगरीतील नवनिर्वाचित नगरसेवक नारायण मांजरेकर, उदयb जाधव, वैभव दालल कोळवणकर, सचिनदादा पुजारे, सुहास दाभोळकर उपस्थित मान्यवरांचे कालिकाई क्रिकेट संघ तारळ संघाकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले.



