*हमीभाव तुर खरेदी नोंदणीला 24 मार्चपर्यंत मुदतवाढ-आर. एस. इंगळे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हमीभाव तुर खरेदी नोंदणीला 24 मार्चपर्यंत मुदतवाढ-आर. एस. इंगळे*
*हमीभाव तुर खरेदी नोंदणीला 24 मार्चपर्यंत मुदतवाढ-आर. एस. इंगळे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-खरीप हंगाम 2025-26 मध्ये नाफेडच्या वतीने सुरू असलेल्या तूर खरेदी प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन तूर नोंदणीसाठी आता 24 मार्च, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी आर. एस. इंगळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
यापूर्वी तूर नोंदणीसाठी 20 फेब्रुवारी 2026 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक शेतकरी अद्याप नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने ही मुदत वाढवून दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी सहकारी संघ लि., नंदुरबार संपर्क क्रमांक 9763286860 व शहादा ता. सहकारी खरेदी-विक्री संघ लि., शहादा संपर्क क्रमांक 7722014165 या केंद्रांवर ही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन शासकीय हमीभावाने तूर विक्रीसाठी आपली नोंदणी त्वरित पूर्ण करावी असेही आवाहन जिल्हा पणन अधिकारी इंगळे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



