*चुलवड गावांतील ऊसतोड आदिवासी मजूर कुटुंबांचे घर जळून खाक,बिरसा फायटर्सकडून आर्थिक मदत, नुकसान भरपाई मिळण्यासाठी तहसीलदार व गटविकास यांना निवेदन
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चुलवड गावांतील ऊसतोड आदिवासी मजूर कुटुंबांचे घर जळून खाक,बिरसा फायटर्सकडून आर्थिक मदत, नुकसान भरपाई मिळण्यासाठी तहसीलदार व गटविकास यांना निवेदन
*चुलवड गावांतील ऊसतोड आदिवासी मजूर कुटुंबांचे घर जळून खाक,बिरसा फायटर्सकडून आर्थिक मदत, नुकसान भरपाई मिळण्यासाठी तहसीलदार व गटविकास यांना निवेदन*
धडगाव(प्रतिनिधी):-धडगाव तालुक्यातील चुलवड गावांतील पिंट्या तडवी यांच्या घराला आग लागून घरासह संसार उपयोगी वस्तू आगीत खाक होऊन नुकसान झाले आहे. घटनेचा पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून तहसीलदार अक्राणी व गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धडगाव तालुक्यातील चुलवड गावात बर्डीपाडा येथे 1 मार्च 2026 रोजी पिंट्या तडवी यांचे घर आगीने राख झाले आहे. त्यात घरकुल योजनेचे व पंढरपूर हुन मंजूरी करून आणलेले 95 हजार रुपये जळाले आहेत. या पाड्यात पाण्याची सोय नसल्यामुळे पाण्या अभावी आग विझवता आली नाही. त्यामुळे संसार उपयोगी कोणतीच वस्तू वाचली नाही. आगीत घरासह घरातील सर्व वस्तू जळून खाक झाले आहेत. तरी धडगाव तालुक्यातील चुलवड गांवातील विक्रम पिद्या तडवी यांच्या घराला आग लागून घरासह संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. म्हणून घटनेचा पंचनामा करून शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे. घटनास्थळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, धडगाव तालुकाध्यक्ष सुनिल तडवी, सचिव मुकेश पावरा, विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे, चंद्रकांत पावरा, शहादा तालुक्यातील सुरेश पवार, दिलीप मुसळदे, आकाश भील, प्रकाशा गाव अध्यक्ष एकनाथ भील आदि कार्यकर्ते उपस्थित होते. सौ.रविता पिंट्या तडवी यांना रोख रक्कम देऊन आर्थिक मदतीला सुरवात केली. या दुखत प्रसंगी संपूर्ण बिरसा फायटर्स़ टिम या आदिवासी मजूर कुटुंबासोबत आहोत, शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी व बिरसा फायटर्स संघटनेकडून सर्वतोपरी शक्य ती मदत आम्ही करू. तसेच समाजातील सर्व घटकांनी या आदिवासी पिडीत मजूर कुटुंबाला शक्य ती आर्थिक मदत स्व इच्छेने करावी,असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केले आहे.



