*वैंदाने येथील पुतळाबाई पाटील विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वैंदाने येथील पुतळाबाई पाटील विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन*
*वैंदाने येथील पुतळाबाई पाटील विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील वैंदाने येथील पुतळाबाई पाटील विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित श्रीमती पुतळाबाई गजमल पाटील विद्यालय वैंदाणे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विविध वैज्ञानिक उपकरणे व प्रकल्प सादर केले. या प्रदर्शनात एकूण 27 उपकरणांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून तयार केलेली विविध मॉडेल्स आणि प्रकल्प प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. विज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरणीय समस्यांवर उपाय सुचवणाऱ्या कलाकृती विशेष आकर्षण ठरल्या.
प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद शाळाचे मुख्याध्यापक किशोर गुलाब देवरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सारंग योगेंद्रसिंग परदेशी होते. त्यांच्या हस्ते विज्ञान भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड जोपासण्याचे तसेच संशोधन वृत्ती विकसित करण्याचे आवाहन केले.
यावेळी गावातील श्रीकांत बोरसे, पुंडलिक पवार, संदीप निकुंभ, भैय्या राजपूत, हेमराज भलकार, नरेंद्र वाघ, दीपक पवार, किशोर पवार, प्रवीण पवार तसेच माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. गौतम पिंपळे व मुजाहिद शेख यांनी परीक्षणाचे काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक एजाज खाटीक यांनी केले, तर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक संजु पंढरीनाथ पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किरण कुवर, गोपालनी मराठे, महेंद्र पाटील, जी. व्ही. पाटील, भरत माळी, विश्वास पाटील व चतुर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन व संपूर्ण आयोजन विज्ञान शिक्षक एजाज खाटीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.



