*अटकळी गावचे भाग्य उजळले, सिमेंट कांक्रीट रस्त्ते व बंदीस्त नाली कामे सुरू*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अटकळी गावचे भाग्य उजळले, सिमेंट कांक्रीट रस्त्ते व बंदीस्त नाली कामे सुरू*
*अटकळी गावचे भाग्य उजळले,सिमेंट कांक्रीट रस्त्ते व बंदीस्त नाली कामे सुरू*
नांदेड(प्रतीनिधी):-नांदेडच्या बिलोली तालुक्यातील "अटकळी" या गावातील अंतर्गत रस्ते मागील काही वर्षापासून पावसाळ्यात चिखलमय होत असल्याचे दिसून येत होते मात्र यावर्षी दरम्यान काळात गावातील प्रवेशद्वाराचा मुख्य रस्ता जो पुर्व - पश्चिम 1700 मिटर लांबीचा आणि जयमल्हार नगर मधील अंतर्गत रस्ते हे सिमेंट कांक्रीटचे बनवीणे सोबतच बंदीस्त नालीचे बांधकाम काम सुरू झाल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर पावसाळ्यामध्ये रस्ते हे अगदी चिखलमय होत असत त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत होता असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले मात्र येथील ग्रामपंचायत कार्यालय व्यवस्थापनाच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसन निधी अंतर्गत सिमेंट रोड करण्यासाठी एक कोटी साठ लक्ष रुपयाचा निधी त्याचबरोबर जय मल्हार नगरमध्ये तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत साठ लक्ष रुपयाच्या निधीच्या माध्यमातून सिमेंट रोड व बंदीस्त नालीचे बांधकाम झपाट्याने सुरू झाले आसल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे नागरीकांतून समाधानाची भावना व्यक्त करण्यात येत असली तरी ही विकासात्मक कामे संबंधीत गुत्तेदाराने दर्जेदार करावीत याकामी गावातील लोकप्रतिनिधीने लक्ष घालावे अशी अपेक्षा गावकरी मंडळी व्यक्त करीत आहेत.



