*वेदमंत्र घोषात मथुरा गुणगौरव महिमा कथा व श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचा पूर्णाहुतीने सांगता*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वेदमंत्र घोषात मथुरा गुणगौरव महिमा कथा व श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचा पूर्णाहुतीने सांगता*
*वेदमंत्र घोषात मथुरा गुणगौरव महिमा कथा व श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचा पूर्णाहुतीने सांगता*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त करण्याचा हेतूने आध्यत्मिक अनुष्ठान म्हणून श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचे व श्रीकृष्ण जन्मभूमीचा सत्य इतिहास काय याची माहिती होण्यासाठी मथुरा गुणगौरव महिमा कथेचे आयोजन करण्यात आले होते. या अनुष्ठानाची पूर्णाहुती संत, महंत, भागवतकार, यजमान, पुरोहित यांच्यासह शेकडो भाविकांच्या उपस्थितीत वेदमंत्र घोषात महायज्ञात आहुती समर्पित करून करण्यात आली. श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास नंदुरबार जिल्हा आयोजित मथुरेरा गुणगौरव कथेचे निरुपण करतांना भागवताचार्य वेदमूर्ती खगेंद्र महाराज बुवा यांनी मथुरेचा पौराणिक संदर्भासह श्रीकृष्ण जन्मभूमी आक्रमणकर्त्यांनी किती वेळा आणि कधी विध्वंसकेले, श्रीकृष्ण मंदिर कितीवेळा विध्वंस केले ते पुन्हा कोणी निर्माण केले, मूळ मूर्ती आता कुठे आहे, ऐतिहासिक पुराव्यानिशी कथेतून विवेचन केले. कथेचा समारोप महाआरतीने करण्यात आला. या अनुष्ठानाचा पूर्णाहुती श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञ श्री गजानन महाराज मंदिर येथे 1 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळात करण्यात आली. महायज्ञाचा सुरुवातीला श्रीविष्णूसहत्रनामाचा ग्रंथ व कलश डोक्यावर ठेऊन यजमान व भाविक यांनी यज्ञ स्थळी प्रवेश केला. 38 यजमान दाम्पत्य यांच्या हातून सकाळी पूजन, स्थापना, देवता आवाहन करून विधिवत पूजन करण्यात आले. दुपारच्या सत्रात श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाला सुरुवात होऊन सायंकाळी महाआरती पूर्णाहुती करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील अनेक श्रीकृष्ण भक्त यांनी 'एक आहुती श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीसाठी' महायज्ञात समर्पित केली. पूर्णाहुती श्रीकृष्ण जन्मभूमीचे सर्वोच्च न्यायालयात लढा देणारे मुख्य याचिककर्ता पंडित दिनेशजी शर्मा (फलाहारी महाराज) मथुरा यांच्या स्वानुभव कथन मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पू फलाहारी महाराज यांच्या सोबत मंचावर भागवताचार्य अविनाश महाराज जोशी, नेपाळी बाबा, भावताचार्य राजीव झा महाराज, कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज माळी, राष्ट्रीय संघटन महामंत्री शंकर वराडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष भिकन वराडे, प्रदेश प्रवक्ता डॉ नरेंद्र पाटील, डॉ उपेंद्र डहाके यांच्यासह यज्ञात वेदमंत्र पठण करणारे पुरोहित व्यासपीठावर उपस्थित होते. प्रदेश प्रवक्ता डॉ नरेंद्र पाटील यांनी न्यासाचा कार्याविषयी प्रस्तावना मांडली तर महायज्ञाचे आध्यत्मिक लाभ विषयी अविनाश महाराज यांनी मार्गदर्शन केले. श्रीकृष्ण जन्मभूमीसाठी सर्वोच्च न्यायालयात लढा देणारे मुख्य याचिककर्ता पंडित दिनेशजी शर्मा (फलाहारी महाराज) मथुरा यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त करण्यासाठी कश्या पद्धतीने हा लढा उभा केला आहे त्यांचा स्वानुभव कथन मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुमित परदेशी तर आभार प्रदर्शन राजश्री सोनार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास नंदुरबार जिल्हा व हिंदु सेवा सहाय्य समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.



