*ज्येष्ठ नागरिकातर्फे नवनिर्वाचितांचा सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ज्येष्ठ नागरिकातर्फे नवनिर्वाचितांचा सत्कार*
*ज्येष्ठ नागरिकातर्फे नवनिर्वाचितांचा सत्कार*
शहादा(प्रतिनिधी):-येथील ज्येष्ठ नागरिक भावना जवळ नगरपालिकेत नवीन निवडून आलेल्या मान्यवरांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात आला. सत्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. जे डी पटेल होते. प्रमुख पाहुणे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील, उपनगराध्यक्षा माधवी पाटील व महिला संघाच्या अध्यक्षा कांता पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात प्रथम मान्यवरांच्या हस्ते फेस्काॅम संघटनेचे संस्थापक डॉ. राधाकृष्ण भट यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. खरा तो एकची धर्म ही प्रार्थना प्रा. जे. डी. पटेल यांनी म्हटली. नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षा व कांता पाटील तसेच नगरसेवक, विषय समिती अध्यक्ष, नगरसेविका, स्वीकृत नगरसेवक, रामभाई पाटील, नूरभाई नुराणी, हेमराज पवार, उर्मिलाबाई पाटील, प्रा.सुनील पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रामजी पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे. डी .पटेल यांनी जेष्ठ नागरिक भवनात असलेल्या उनिवा वीज व नळ यांची पूर्तता करावी. नवीन भवनासाठी जागा मिळावी, व स्मशानभूमीत दशक्रिया विधी हॉल तयार करण्यात यावा आदी मागण्या केल्या. सत्काराला उत्तर देताना लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले, नगर परिषदेत निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित सदस्य आम्ही पाच वर्षे एक संघाने काम करू. ज्येष्ठ नागरिक भवनातील सर्व बाबींची पूर्तता करण्यास आम्ही प्रयत्नशील राहू. शहादा शहराचा विकासासाठी आम्हाला आपले सहकार्य आवश्यक आहे, असे म्हणाले. समारोप भाषणात उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील म्हणाल्या, आम्ही सर्व मिळून शहादा शहराच्या विकास होण्यासाठी व सुंदर शहर करण्यासाठी ज्या ज्या बाबी करणे आवश्यक आहे त्या करू. तुम्ही आमचा मोठ्या मनाने सत्कार केला, चांगले आशीर्वाद दिले आणि तुम्ही केलेल्या सूचनांचे आम्ही पालन करू असे शेवटी म्हणाल्या. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघातील सचिव गजानन विसपुते, डी. एच पाटील, डॉ. सुरेश पाटील, अॅ. गोविंद पाटील, विवेक पाटील, उद्योजक नूरभाई नुराणी, सचिव हेमराज पवार, उर्मिला पाटील, राजेंद्र पाटील व सर्व जेष्ठ नागरिक संघाचे सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील पाटील यांनी केले, आभार रघुनाथ बेलदार यांनी मानले. पसायदान के.डी गिरासे यांनी म्हटले.



