*शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ता बैठक संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ता बैठक संपन्न*
*शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ता बैठक संपन्न*
यवतमाळ(प्रतिनिधी):-25 फेब्रुवारी 2026 रोजी यवतमाळ जिल्हा पूर्व विभागीय आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर मदन वरघट यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता बैठक घेण्यात आली. सदर बैठकीला प्रबोधन करताना त्यांनी बहुजन चळवळीचे उद्देश व महत्त्व आणि त्यापासून मिळणारे परिणाम याचा सविस्तर आणि सोप्या शब्दात विचार मांडला त्यांनी आपल्या मनोगतात कार्यकर्त्यांना सांगितले की आझाद समाज पार्टीचा उद्देश काय आहे. कार्य काय आहे. पार्टी विस्ताराकरिता कोणते कार्यक्रम, प्रयत्न करावे कशाच्या आधारावर लोकांपर्यंत पोचता येईल आझाद समाज पार्टीच का निवड करावी किंवा समर्थन द्यावे ह्याकरिता बहुजन चळवळीचे मर्म त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले बहुजन महापुरुषांच्या विचारावर छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर बिरसा मुंडा, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर पेरियार, अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ, सावित्री आई, रमाई माँ फातिमा ह्यांच्या विचारांना चळवळीतील वळण देणारी एकमेव पार्टी आजाद समाज पार्टी ह्याच विश्लेषण करून त्यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण केली सर्व कार्यकारणी शांत चित्ताने त्यांचे प्रबोधन ऐकले आणि पक्षाच्या विस्ताराकरिता कार्यकर्त्यांनी आत्म चिंतनाने होकार दर्शविला बैठकीचे सूत्रसंचालन मेजर जीवन कोवे यांनी केले तर आभार प्रदर्शन जोशना जोस्ना उईके यांनी केले बैठकीला उपस्थित माजी सैनिक जगत चव्हाण गणपतराव गाडेकर, गजानन ठाकरे ओंकार कुमरे जीवन कोवे होते तर कार्यकर्त्यांत विनोद भगत बळीराम मंगुळकर सचिन आत्राम बंडू उईके, हरीश मोठघरे (ASP शहर प्रमुख) सचिन आत्राम, रामेश्वर ढगे, बिपिन आत्राम, अशोक लांडगे, भीमराव काळे, ओंकार मडपाची निशांत बावने, उत्कर्ष गवळी ओंकार कुंबरे, सचिन आत्माराम, आशिष वनकर विनायक थूल, सौ चंदा कांबळे, सौ रेखा थूल, सौ.किरण भगत, समीर नागवटकर, मनीषा मेश्राम, अक्षय मानकर, मृनाली कोवे, यशवंत भगत, चेतन कन्नाके, समीर नागमोते आदी उपस्थित होते.



