*मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा,खरेदीचे उद्दिष्ट 4 हजार क्विंटलने वाढले आ.चंद्रकांत रघुवंशींचा पाठपुरावा, शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा,खरेदीचे उद्दिष्ट 4 हजार क्विंटलने वाढले आ.चंद्रकांत रघुवंशींचा पाठपुरावा, शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त*
*मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा,खरेदीचे उद्दिष्ट 4 हजार क्विंटलने वाढले आ.चंद्रकांत रघुवंशींचा पाठपुरावा, शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाकडून मका खरेदीचे लक्षांक संपल्याने अनेक शेतकरी हमीभावापासून वंचित राहिले होते. मात्र, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे आता मका खरेदीच्या उद्दिष्टात 4 हजार क्विंटलने वाढ करण्यात आली आहे. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांचा मका आता शासकीय केंद्रावर खरेदी केला जाणार असून, त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
नंदुरबार बिगर आदिवासी क्षेत्रातील मका खरेदी केंद्रासाठी सन 2025-26या वर्षाकरिता एकूण 330 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. या शेतकऱ्यांकडे सुमारे 10 हजार क्विंटल मका विक्रीसाठी उपलब्ध होता. मात्र, सुरुवातीला शासनाने केवळ 4500 क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट केवळ 165 शेतकऱ्यांच्या खरेदीतच पूर्ण झाले, परिणामी उर्वरित 165 शेतकरी आपला शेतीमाल हमीभावाने विकण्यापासून वंचित राहिले होते.
शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेता, नंदुरबार शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी. के. पाटील यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न सुरू केले. आमदार रघुवंशी यांनी तातडीने राज्याचे पणन व अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून वाढीव उद्दिष्टाची मागणी केली. या प्रयत्नांना यश आले असून, शासनाने अतिरिक्त 4 हजार क्विंटल मका खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फायदा होणार असून, तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे. या कामात विशेष सहकार्य केल्याबद्दल नंदुरबार शेतकरी सहकारी संघ आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे मनापासून आभार मानले आहेत.



