*चिपळूण कुणबी चषक 2026 एक भव्य सोहळा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चिपळूण कुणबी चषक 2026 एक भव्य सोहळा*
*चिपळूण कुणबी चषक 2026 एक भव्य सोहळा*
दिवा(प्रतिनिधी):-नगरीतील डम्पिंग ग्राउंडवर कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (शाखा चिपळूण) यांच्या वतीने शनिवार दि.21 आणि रविवार 22 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेली पहिली भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. चिपळूण शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्पर्धेने. समाजबांधवांमध्ये एकतेचा संदेश दिला. एकूण 24 दर्जेदार संघांनी या स्पर्धेत आपला खेळ सादर केला. स्पर्धेला प्रारंभ दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. शाखेचे उपाध्यक्ष सचिन बुदर यांनी श्रीफळ अर्पण केले पदाधिकारी यांच्या हस्ते भव्य 'ट्रॉफी'चे अनावरण करण्यात आले. या स्पर्धेत
दोन दिवसांच्या अटीतटीच्या सामन्यानंतर प्रथम क्रमांक- मालदोली क्रिकेट संघ, द्वितीय क्रमांक-विठ्ठल रखुमाई तनाळी, तृतीय शिववैभव सडेवाडी कळंबट चतुर्थ क्रमांक- चंडिका केरे संघ, दत्तकृपा खरवते तांबिटकर वाडी संघ आणि वाघजाईदेवी क्रिकेट संघ घवाळवाडी कळंबट आदी संघांनी आपले नाव कोरले
आपल्या समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन तसेच या स्पर्धेला अनेक मान्यवर आणि हितचिंतक यांची उपस्थिती लाभली, प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले वसंत उदेग यांनी उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवले. स्पर्धेचे कौतुक करताना त्यांनी "पुढील वर्षी यापेक्षाही मोठे आणि भव्य नियोजन करू" असा दिलेला शब्द आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
स्पर्धेदरम्यान कार्यकर्ते यासाठी दिव्या मधील 'ओंकार चाल' रहिवासी आणि खाडे परिवार त्याच प्रमाणे रवींद्र बळकटे यांनी दोन दिवस जेवण, नाश्ता आणि चहाची उत्तम सोय केली. त्यांच्या या बहुमूल्य योगदानाबद्दल यावेळी आभार मानण्यात आले स्पर्धेची रंगत वाढवणारे समालोचन ज्यांच्या आवाजाने स्पर्धेत चैतन्य निर्माण केले, ते उत्कृष्ट समालोचक अजय होडे आणि सतीश रांगळे यांच्या दमदार समालोचनामुळे स्पर्धा खऱ्या अर्थाने रंगतदार झाली. त्याच प्रमाणे दीपक कारकर, अभि वणे आणि विनोद काळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
पंच म्हणून सुरेश बने, अनिल गोताड आणि सुदेश पाष्टे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यशाचे खरे शिलेदार (आयोजक समिती)
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले
सचिन बुदर (उपाध्यक्ष), शरद बोबले, विवेक आगरे, सचिन काटकर, संदीप नवरंग, निलेश पवार, अमेय खापरे, रवींद्र बळकटे, सचिन गोमाणे, सुनील निर्मळ, सुनील खाडे, सचिन कुळे, निलेश कोकमकर, अनिल पेंढारे, दिपक चव्हाण, निलेश वनगे, अमित गोमाणे, सचिन मोरे वैभव बुदर, संदीप तांबे, संतोष आग्रे आणि चिपळूण शाखेचे सर्व शिलेदार. शेवटी, सर्व देणगीदार, हितचिंतक आणि समाज बांधव यांच्या अनमोल सहकार्याशिवाय हे यश अशक्य होते. या स्पर्धेला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे कुणबी शाखा चिपळूण यांच्या वतीने सरचिटणीस रणजित वरवटकर यांनी आभार मानले आहेत.



