ताजा खबरे:
*ज्येष्ठ नागरिकातर्फे नवनिर्वाचितांचा सत्कार*
*शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ता बैठक संपन्न*
*मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा,खरेदीचे उद्दिष्ट 4 हजार क्विंटलने वाढले आ.चंद्रकांत रघुवंशींचा पाठपुरावा, शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त*
*चिपळूण कुणबी चषक 2026 एक भव्य सोहळा*
*कोंडगे गावातील‌ पालटोक धनगरवाडीची पाणीटंचाई समस्या सोडवण्याचे आ.किरण सामंत यांचे आश्वासन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कृषि विज्ञान केंद्र,नंदुरबार येथे आधुनिक भाजीपाला नर्सरी तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कृषि विज्ञान केंद्र,नंदुरबार येथे आधुनिक भाजीपाला नर्सरी तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न*

  • Share:

*कृषि विज्ञान केंद्र,नंदुरबार येथे आधुनिक भाजीपाला नर्सरी तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनवाढ साध्य करण्याच्या उद्देशाने कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार येथे दिनांक 25 ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला नर्सरी प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे सचिव डॉ. नितीन पंचभाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा नंदुरबारचे प्रकल्प संचालक दीपक पटेल उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून शेतकऱ्यांनी आधुनिक नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून गुणवत्तापूर्ण रोपे तयार करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.
या प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून डॉ. वैभव गुर्वे यांनी नियोजन, अंमलबजावणी व मार्गदर्शनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन श्रीमती आरती देशमुख आणि राजेश भावसार यांनी केले. तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये सहभागी युवा शेतकऱ्यांना प्रो ट्रे भाजीपाला नर्सरी उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान देण्यात आले. यामध्ये योग्य बियाण्यांची निवड, कोकोपीट व इतर माध्यमांची तयारी, ट्रे भरण्याची पद्धत, रोपांची संगोपन तंत्रे, पाणी व्यवस्थापन, पोषण व्यवस्थापन तसेच रोग व कीड नियंत्रण यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कमी खर्चात अधिक दर्जेदार रोपे तयार करण्याच्या पद्धतींबाबतही माहिती देण्यात आली. प्रशिक्षणा दरम्यान तज्ज्ञ व्याख्यानांच्या माध्यमातून सहभागी युवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये जयंन्त उत्तरवार, पद्माकर कुंदे, डॉ. भूषण बिरारी, डॉ. विनायक फसाके आणि गणेश सदगीर यांनी आपल्या विषयानुरूप सखोल माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप कुवर, डॉ. खुशाल राठोड, किरण मराठे, कल्याणराव पाटील, कैलास सोनवणे, राजेसिंग साजपुत आणि अनिल वळवी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे प्रशिक्षण सुरळीतपणे पार पडले. प्रशिक्षणाचा समारोप सोहळाही उत्साहपूर्ण वातावरणात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त स्वप्नील पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी संचालक (फलोत्पादन) डॉ. कैलाश मोते उपस्थित होते. यावेळीही राजेंद्र दहातोंडे व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करून उत्पन्नवाढ साधावी, असे आवाहन केले.
प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून सहभागी शेतकऱ्यांना नाशिक येथील ओम गायत्री नर्सरी आणि सह्याद्री फार्म येथे प्रात्यक्षिक पाहणी दौरा घडवून आणण्यात आला. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी आधुनिक नर्सरी व्यवस्थापन, स्वयंचलित सिंचन व्यवस्था, उच्च दर्जाची रोपे निर्मिती प्रक्रिया यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या अनुभवामुळे प्रशिक्षण अधिक उपयुक्त ठरल्याचे सहभागी शेतकऱ्यांनी सांगितले.
एकूणच, या प्रशिक्षणामुळे युवा शेतकऱ्यांच्या ज्ञानात व कौशल्यात लक्षणीय वाढ होऊन गुणवत्तापूर्ण रोपे निर्मिती, उत्पादनवाढ आणि शेतीतील नफ्यात वाढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळाले, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ज्येष्ठ नागरिकातर्फे नवनिर्वाचितांचा सत्कार*
February, 28 2026
*शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ता बैठक संपन्न*
February, 28 2026
*मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा,खरेदीचे उद्दिष्ट 4 हजार क्विंटलने वाढले आ.चंद्रकांत रघुवंशींचा पाठपुरावा, शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त*
February, 28 2026
*चिपळूण कुणबी चषक 2026 एक भव्य सोहळा*
February, 28 2026
*कोंडगे गावातील‌ पालटोक धनगरवाडीची पाणीटंचाई समस्या सोडवण्याचे आ.किरण सामंत यांचे आश्वासन*
February, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज