*जी.टी.पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी.पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा*
*जी.टी.पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विभाग आणि वाङ्मय मंडळाच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ.एम. जे. रघुवंशी हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी मराठी साहित्यिकांच्या साहित्यकृतींनी मराठी भाषेला समृद्ध व प्रगल्भ केले असल्याचे सांगितले. कुसुमाग्रजांचे लेखन कार्य अत्यंत मौल्यवान असून त्यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिवस हा मराठी संस्कृतीचा उत्सव असल्याचे त्यांनी प्रतिपादन करत त्यांनी विद्यार्थ्यांना आपले विचार, भावना, अनुभव यांचा आविष्कार कथा, कविता, ललित लेख या साहित्यप्रकारातून करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा अतिथी युवा कवी संतोष पावरा यांनी प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येत असते; त्यातून आपण स्वत:ला घडवले पाहिजे असे साहित्यविषयक स्वानुभवातून कथन केले. त्यांनी आदिवासी बोलीबरोबरच मराठी, हिंदी भाषेत गेय पद्धतीने कविता सादर करून विद्यार्थ्यांमध्ये भाषिक अभिमान व सांस्कृतिक चेतना निर्माण केली.
संस्थेचे समन्वयक डॉ.एम.एस.रघुवंशी यांनी मराठी भाषेचा विकास दिवसेंदिवस होत असल्याचे नमूद करत, मराठी भाषेविषयी तितकेच प्रेम व आदर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. सुलतान पवार यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाङ्मय मंडळाचे समन्वयक डॉ. माधव कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मनोज शेवाळे, प्रा. महेंद्र गावीत, प्रा. शशिकला नाईक, प्रा. रुपाली जगताप, प्रा.प्रल्हाद वसावे, प्रा.प्रमेश वसावे व प्रा. माळी यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी प्रा. ज्ञानेश्वर सुपलेकर, डॉ.माधव वाघमारे, डॉ.सविता पटेल उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमान, जाणीव आणि सर्जनशीलतेची प्रेरणा निर्माण झाली.



