*नायगांव ते उमरी राज्यमहामार्ग 264 चे नूतनीकरण काम सुरु नागरीक समाधान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नायगांव ते उमरी राज्यमहामार्ग 264 चे नूतनीकरण काम सुरु नागरीक समाधान*
*नायगांव ते उमरी राज्यमहामार्ग 264 चे नूतनीकरण काम सुरु नागरीक समाधान*
नायगांव(प्रतिनिधी):-नांदेड जिल्ह्यातील नायगांव ते उमरी या दोन तालुक्यांना जोडणारा राज्य मार्ग क्रमांक 264 अखेर नव्या रुपात साकारत आहे. तब्बल पन्नास वर्षांपासून दळणवळणाचा कणा मानला जाणारा हा 29 किलोमीटरचा मार्ग खड्डेमय धुळीचे ढग आणि वारंवार होणारे अपघात यामुळे नागरिकांच्या संतापाचा विषय ठरला होता. मात्र आता या मार्गाच्या नूतनीकरणाचे काम वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने सुरू झाले असून परिसरात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मार्फत राज्य मार्ग 264 (ईपीसी एनडी-2, 33-अ) अंतर्गत उमरी, तळेगाव, बळेगाव, सातेगाव, ईळीमाळ, कुंटूर, कोकलेगाव, शेळगाव (छत्री) मार्गे नायगांव हेडगेवार चौकापर्यंत दोन पदरी सुसज्ज रस्ता मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या विकासाला गती मिळाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर; कामात वेग आणि गुणवत्ता हे महत्त्वाकांक्षी काम पुणे येथील राजसेतू प्रोजेक्ट कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. कंपनीकडून अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने काम जोमात सुरू असून मजबूत बांधकाम, शास्त्रोक्त पद्धतीने बेस लेयर टाकणे, योग्य दाबदाबणी आणि गुणवत्तेची काटेकोर तपासणी या सर्व बाबींवर विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे हा रस्ता केवळ देखणा नव्हे, तर दीर्घकाळ टिकणारा ठरेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. दहा वर्षांची देखभाल राजसेतूकडे राहणार, विशेष म्हणजे या प्रकल्पांतर्गत पुढील दहा वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही संबंधित कंपनीकडेच राहणार आहे. त्यामुळे रस्ता पुन्हा दुरवस्थेत जाणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांना दीर्घकालीन सुरक्षित आणि सुकर प्रवासाची हमी मिळणार आहे.
व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी यांना मोठा लाभ या मार्गाच्या उभारणीमुळे वाहतूक सुरळीत होणार असून व्यापारी वर्गाला मालवाहतुकीत गती मिळेल. शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारपेठेत वेळेत पोहोचविणे सुलभ होईल. विद्यार्थी आणि रोजंदारी कामगार यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
त्रासदायक मार्गाचे ‘सुरक्षित महामार्गात रुपांतर !,एकेकाळी वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरलेला नायगांव ते उमरी मार्ग आता मजबूत, रुंद आणि सुरक्षित महामार्गाच्या दिशेने वाटचाल करत आहे. विकासाच्या या टप्प्यामुळे संपूर्ण परिसराच्या प्रगतीला नवे पंख लाभणार आहेत. नागरिकांकडून राजसेतू कंपनीच्या कार्यपद्धतीचे आणि प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून, अर्धशतकाची प्रतीक्षा अखेर फळाला आली आसल्याच्या प्रतीक्रीया सर्व सामान्य नागरीकांतून व्यक्त होत आहेत.



