*नंदुरबार महसूल विभागामार्फत तालुक्यात 7 मार्च ते 5 मे 2026 दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान, सर्व गावांसाठी 15 पेक्षा अधिक महसुली सुविधा उपलब्धबाबत अभियान राबविणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार महसूल विभागामार्फत तालुक्यात 7 मार्च ते 5 मे 2026 दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान, सर्व गावांसाठी 15 पेक्षा अधिक महसुली सुविधा उपलब्धबाबत अभियान राबविणार*
*नंदुरबार महसूल विभागामार्फत तालुक्यात 7 मार्च ते 5 मे 2026 दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान, सर्व गावांसाठी 15 पेक्षा अधिक महसुली सुविधा उपलब्धबाबत अभियान राबविणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तहसील कार्यालयामार्फत गाव पातळीवर सुलभ व जलद तसेच पारदर्शक पद्धतीने महसूल विभागाच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात आले असून, या शिबिरात मंडळनिहाय मंडळातील सर्व गावांसाठी एकाच छताखाली 15 पेक्षा अधिक महसुली सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून, शासन आपल्या दारी ही संकल्पना प्रभावी राबविण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असून, या शिबिरास तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहून, आपला कार्यभार सांभाळणार आहेत, अर्जदाराचे कागदपत्र पूर्ण असल्यास त्या दिवशीच काम करून देण्याचं या शिबिराचे उद्दिष्ट असणार आहे, शिबिराचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असणार आहे मंडळाचे नाव आष्टे 7 मार्च 2026 सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय वाघाळे, कोरीट 14 मार्च 2026 सकाळी 11 वाजता सिद्धेश्वर मंदिर कोरीट, खोंडामळी 14 मार्च 2026 सकाळी 11 वाजता खोंडामळी, धानोरा 10 एप्रिल 2026 सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय धानोरा, मांडळ 17 एप्रिल 2026 सकाळी 11 वाजता शनिमांडळ, रनाळे 8 मे 2026 सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद शाळा न्याहाली, नंदुरबार 15 मे 2026 सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालय नांदरखे, यावेळी शिबिरात दिल्या जाणाऱ्या सुविधा, प्रलंबित फेरफार, सातबारा मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरी सातबारा आणि आठ अ उताऱ्याचे वाटप, उत्पन्न रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, अकृषीक परवानगी, अकृषीक तरतुदींना बाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सीकलसेल पीडीतांसाठी लाभाच्या योजना, सामाजिक लाभाच्या योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंगणा बाबतच्या प्रकरणाचा निपटारा करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, घरांसाठी पट्टेवाटप, ई मोजणी अर्ज, ॲग्री स्टिक आणि पीएम किसान नोंदणी, भूसंपादन आणि अकृषीक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रक तयार करून गाव दप्तरी अद्यवात केली जाणार, पुरवठा विभाग संबंधित प्रकरणे, ग्रामविकास विभागाकडून दिला जाणाऱ्या सूचना, याबाबतच्या शिबिरात जनतेसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती, नंदुरबार तालुका तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी दिली आहे, या शिबिरांचा तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



