*बामखेडा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा*
*बामखेडा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुंदर पाडवी यांनी केले त्यात त्यांनी कार्यक्रमाचा हेतू कथन केला त्यात ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला .
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. वाय. सी. गावित यांनी मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यिक वारसा आणि आधुनिक काळातील उपयुक्तता यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. जागतिकीकरणाच्या युगात मातृभाषेचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कविता वाचन केले व मनोगतातून मराठी भाषेबद्दलचा अभिमान व्यक्त केला. तर आभार प्रगटन डॉ. के. पी. पाटील यांनी केले.



