*नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या हेल्मेट सक्ती मोहिमेला यश,अपघातात नंदुरबार येथील शिक्षकाचा जीव वाचला प्रशासनाचा संदेश प्रभावी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या हेल्मेट सक्ती मोहिमेला यश,अपघातात नंदुरबार येथील शिक्षकाचा जीव वाचला प्रशासनाचा संदेश प्रभावी*
*नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या हेल्मेट सक्ती मोहिमेला यश,अपघातात नंदुरबार येथील शिक्षकाचा जीव वाचला प्रशासनाचा संदेश प्रभावी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्यातर्फे सध्या संपूर्ण नंदुरबार जिल्हाभरात हेल्मेट सक्तीची कारवाई करण्यात येत आहे, आणि त्याचा अनुभव महाविद्यालयाचे प्राध्यापक यांना आला असून, त्यांनी दुचाकी चालवताना डोक्यात हेल्मेट घातल्यामुळे त्यांचा यामुळे जीव वाचला आहे. 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वा. च्या सुमारास कोरीट येथील ज्युनिअर कॉलेजला प्राध्यापक असलेले भरत चव्हाण हे त्य
त्यांच्या मोटरसायकल MH 39 D 6916 हीच्याने कोरिट येथे नोकरीनिमित्त जात होते. त्यावेळी त्यांनी हेल्मेट परिधान केले होते, समशेरपुर कारखान्यालगत पोहचल्यानंतर त्यांच्या मागावून एक आयशर ट्रक MH 18 BG 9358 आला व त्याने त्यांना उजव्या बाजूने जोरात धडक दिली, त्यात त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि ते रोडावर जाऊन खाली पडले, त्यावेळी त्यांनी हेल्मेट घातले असल्यामुळे त्यांच्या डोक्याला कुठलीही दुखापत झाली नाही. परंतु त्यांच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याकरिता त्यांना उपचारासाठी स्मित हॉस्पिटल, नंदुरबार येथे दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे BNS विविध कलमान्वये आयशर ट्रक चालक याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अपघातामध्ये मयत होण्याचे प्रमाण हे डोक्याला दुखापत झाल्याने जास्त आहे, याकरिता नंदुरबार जिल्हा पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग नंदुरबार यांच्यातर्फे सर्व दुचाकी चालक यांना हेल्मेट सक्तीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



