*शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी अन् आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुरावा,नगरपंचायतीचा नवीन कर आकारणीला तात्पुरती स्थगिती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी अन् आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुरावा,नगरपंचायतीचा नवीन कर आकारणीला तात्पुरती स्थगिती*
*शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी अन् आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुरावा,नगरपंचायतीचा नवीन कर आकारणीला तात्पुरती स्थगिती*
धडगाव(प्रतिनिधी):-येथील नगरपंचायतकडून नविन कर आकारणीस तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. नवीन कर आकारणीमुळे नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे धाव घेत दखल घेण्याची मागणी केली होती. रघुवंशींनी देखील तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाशी पाठपुरावा केला असता नवीन कर आकारणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. नगरपंचायत धडगाव वडफळ्या रोषमाळ (बु.) हे क्षेत्र पूर्णतः आदिवासी व दुर्गम भागात येत असून, येथील बहुतांश नागरिक दारिद्रय रेषेखालील आहेत. सदर भागात उद्योगधंदे, रोजगाराची साधने अत्यल्प आहे. नागरिकांचा मुख्य उदरनिर्वाह शेती व मजुरीवर अवलंबून आहे. सद्यस्थितीत नगरपंचायतमार्फत विविध प्रकारचे कर आकारले जात असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नांगरिकांना हे कर भरणे अत्यंत कठीण जात आहे. रोजगाराच्या अभावामुळे व उत्पन्नाचे मर्यादित स्रोत असल्यामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. हि बाब लक्षात घेता नगरपंचायत धडगाव वडफळ्या रोषमाळ (बु.) येथील नविन कर आकारणीस तात्पुरती स्थगिती देण्यात यावी तसेच आदिवासी नागरिकांना योग्य ती सवलत मिळावी यासाठी माजी जि. प. सदस्य, ज्येष्ठ पदाधिकारी विजय पराडके, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील यांनी शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशींना दखल घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार, आ. रघुवंशींनी तात्काळ शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नवीन कर आकारणी स्थगिती देण्याची मागणी केली. आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या पुराव्यातून अखेर नवीन कर आकारणीस स्थगिती मिळालेली आहे.



