*अमानुषपणे लैंगिक अत्याचार करुन महिलेचा खुन करणारा आरोपी 12 तासांच्या आत पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलीसांची कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अमानुषपणे लैंगिक अत्याचार करुन महिलेचा खुन करणारा आरोपी 12 तासांच्या आत पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलीसांची कामगिरी*
*अमानुषपणे लैंगिक अत्याचार करुन महिलेचा खुन करणारा आरोपी 12 तासांच्या आत पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलीसांची कामगिरी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-दि.24 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळच्या दरम्यान गंगापुर ता. नवापुर जि. नंदुरबार येथील गंगापुर ते नानगीपाडा रस्त्यालगत एका शेतात 55 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिचे गुप्तांगात अमानुषपणे गंभीर दुखापत केल्याने तिचा मृत्यू घडल्याची गंभीर घटना घडली. सदर घटनेतील महिला जखमी अवस्थेत शेतात मिळून आल्याने तिचे नातेवाईकांनी पोलीस व स्थानिक नागरिकांचे मदतीने जखमी महिलेस वैदयकीय उपचाराकामी रुग्णालयात दाखल केले, परंतु वैदयकीय अधिकारी यांनी महिलेस तपासुन मयत घोषित केले होते, त्याअन्वये विसरवाडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 116/2026 भा. न्या. संहिता कलम 103(1), 66 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. उपलब्ध माहिती व फिर्याद प्रमाणे सदरचा गुन्हा हा गंगापुर, ता. नवापुर येथील मनिल छगन नाईक ऊर्फ टायबू, वय 23 वर्षे, रा. गंगापुर ता. नवापूर जि. नंदुरबार याने केला असल्याचे निष्पन्न झाले व तो गावातून फरार असल्याचे समजले. त्यानुसार सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मार्गदर्शन करुन आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याबाबत सुचना केल्या. स्था. गु.शा. पथक व विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी नरेंद्र साबळे यांचे पथक यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. तद्नंतर स्था. गु.शा. प्रभारी हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी मनिल छगन ऊर्फ टायबू हा चिंचपाडा रेल्वे स्थानक परिसरात असुन तो कोठेतरी पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे, बाबत खात्रिशीर माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलीस पथकांनी फरार इसमाचा शोध घेत त्याचा पाठलाग करत त्यास नवापुर रेल्वे स्थानक परिसरातुन शिताफिने ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी करुन अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी नरेंद्र साबळे, स्था.गु.शा.पोउपनि मुकेश पवार, विकास गुंजाळ, विसरवाडी पो. ठाण्याचे पोउपनि, देविदास वडघुले, स्था.गु.शा. अंमलदार असई राकेश वसावे, पोहेकों/मुकेश तावडे, सचिन वसावे, पोकों/रामेश्वर चव्हाण तसेच विसरवाडी पोलीस ठाण्याचे असई रामचंद्र मोहने, पोहेकॉ सुरेश मोरे, चापोहेकों/कौतिक कोकणी, पोशि/लिनेश पाडवी, निखिल ठाकरे, सागर चौधरी, श्याम पेंढारे, विश्वनाथ नाईक, मपोशि/प्रिया मोरे यांनी केली आहे.



